अफगाणिस्तान अ संघ इमर्जिंग आशिया कप २०२४ चा विजेत बनला आहे. अफगाणिस्तानने अंतिम सामन्यात (२७ ऑक्टोबर) श्रीलंका अ संघाचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवला. इमर्जिंग आशिया चषकाची फायनल अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अल अमिराती क्रिकेट मैदानावर खेळला गेली. या स्पर्धेचे जेतेपद पटकावून अफगाणिस्तानचा संघ कनिष्ठ स्तरावर आशियाचा नवा बॉस बनला आहे.
गेल्या वर्षी पाकिस्तानने इमर्जिंग एशिया कप जिंकला होता. आता अफगाणिस्तानने हे विजेतेपद पटकावले आहे. अफगाणिस्तानने यापूर्वी उपांत्य फेरीत तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाचा २० धावांनी पराभव केला होता. फायनलमध्ये अफगाणिस्तान अ ने श्रीलंका अ संघाचा सहज धुव्वा उडवला.
अफगाणिस्तान अ संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत श्रीलंका अ संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १३३ धावा केल्या.
श्रीलंका अ संघाकडून सहान अरचिगेने सर्वाधिक ६४ धावा केल्या. श्रीलंकेची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. अफगाणिस्तान अ संघाकडून बिलाल सामीने सर्वाधिक ३ बळी घेतले तर अल्लाह मोहम्मद गझनफरने २ बळी घेतले.
संबंधित बातम्या