AFG vs BAN : एक मॅच आणि दोघांचा गेम! अफगाणिस्ताननं क्रिकेट जगताला चकीत केलं; सेमीफायनलमध्ये धडक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  AFG vs BAN : एक मॅच आणि दोघांचा गेम! अफगाणिस्ताननं क्रिकेट जगताला चकीत केलं; सेमीफायनलमध्ये धडक

AFG vs BAN : एक मॅच आणि दोघांचा गेम! अफगाणिस्ताननं क्रिकेट जगताला चकीत केलं; सेमीफायनलमध्ये धडक

Jun 25, 2024 11:28 AM IST

बांगलादेशचा पराभव करत आणि ऑस्ट्रेलियाला धक्का देत अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघानं टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. या विजयाची सर्वत्र चर्चा आहे.

अफगाणिस्ताननं क्रिकेट जगताला अचंबित केलं! एकाच मॅचमध्ये केला दोन संघांचा गेम; सेमीफायनलमध्ये धडक
अफगाणिस्ताननं क्रिकेट जगताला अचंबित केलं! एकाच मॅचमध्ये केला दोन संघांचा गेम; सेमीफायनलमध्ये धडक (AP)

Afghanistan VS Bangladesh : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. राशीद खानच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्यांदाच आयसीसी इव्हेंटच्या सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. अफगाणिस्तानने शेवटच्या सुपर-८ सामन्यात (२५ जून) बांगलादेशचा ८ धावांनी पराभव केला.

बांगलादेशच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आता अफगाणिस्तान २७ जूनला भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता आफ्रिकेला भिडणार आहे. सेमी फायनलचा हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जाईल.

अफगाणिस्तान पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये

अफगाणिस्तान संघ २०१० पासून टी-20 विश्वचषक खेळत आहे, आता २०२४ मध्ये प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ही सध्या त्यांची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

अफगाणिस्तान सुसाट

या स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. अफगाणिस्तानने या विश्वचषकात युगांडाविरुद्ध विजय नोंदवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. त्याचप्रमाणे अफगाण संघाची विजयी घोडदौड कायम राहिली आणि आता त्यांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता उपांत्य फेरीत २७ जूनला अफगाणिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेला भिडणार आहे.

ऑस्ट्रेलियाला दणका

अफगाणिस्तानने आपल्या सुपर-८ सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून मोठी खळबळ उडवून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतरच संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा वाढल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर अफगाणिस्तानला सेमी फायनल गाठण्यासाठी बांगलादेशला पराभूत करणे गरजेचे होते, आणि संघाने नेमके तेच केले. सुपर-८ मधील दोन विजयांसह अफगाणिस्तानने गट-१ मधून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गट-१ मधून उपांत्य फेरीत धडक मारणारा अफगाणिस्तान हा भारतानंतरचा दुसरा संघ ठरला आहे.

सेमी फायनलचे वेळापत्रक

दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान

२७ जून, सकाळी ६ वाजता, त्रिनिदाद

इंग्लंड वि. भारत

२७ जून, रात्री ८ वाजता, गयाना

अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका सेमी फायनल रंगणार

अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत सेमी फायनल गाठली. बांगलादेशच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आता अफगाणिस्तान २७ जूनला भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता आफ्रिकेला भिडणार आहे. सेमी फायनलचा हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत-इंग्लंड सेमी फायनल रंगणार

टी-20 विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जून रोजी होणार आहे. हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर आतापर्यंत भारतीय संघाने २०२४ च्या टी-20 विश्वचषकात एकही सामना खेळलेला नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या