मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AFG : राशीद आणि नबी तर आहेतच, पण अफगाणिस्तानच्या या खेळाडूपासूनही भारताला सर्वात मोठा धोका, जाणून घ्या

IND vs AFG : राशीद आणि नबी तर आहेतच, पण अफगाणिस्तानच्या या खेळाडूपासूनही भारताला सर्वात मोठा धोका, जाणून घ्या

Jun 20, 2024 05:05 PM IST

ind vs afg t20 super 8 match : टी-20 विश्वचषकात रहमानउल्ला गुरबाजची बॅट चांगलीच बोलत असल्याचे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. रहमानउल्ला गुरबाज हा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे.

IND vs AFG : राशीद आणि नबी तर आहेतच, पण अफगाणिस्तानच्या खेळाडूपासूनही भारताला सर्वात मोठा धोका, जाणून घ्या
IND vs AFG : राशीद आणि नबी तर आहेतच, पण अफगाणिस्तानच्या खेळाडूपासूनही भारताला सर्वात मोठा धोका, जाणून घ्या (PTI)

ind vs afg t20 world cup 2024 : टी-20 विश्वचषकात आज भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत.  सुपर-८ फेरीचा हा सामना बार्बाडोसमध्ये भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल. अफगाणिस्तानचे सुपरस्टार मोहम्मद नबी आणि राशिद खान यांच्यावर भारतीय चाहत्यांची नजर असेल. 

वास्तविक, दोन्ही खेळाडू एकहाती सामन्याचा मार्ग बदलण्यास सक्षम आहेत, परंतु या दोघांशिवाय भारतीय संघाला अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि यष्टिरक्षक रहमानउल्ला गुरबाजपासून सावध राहावे लागेल. रहमानउल्ला गुरबाज टीम इंडियासाठी मोठा धोका बनू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

रहमानउल्ला गुरबाज भारतासाठी मोठा धोका!

वास्तविक, या टी-20 विश्वचषकात रहमानउल्ला गुरबाजची बॅट चांगलीच बोलत असल्याचे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. रहमानउल्ला गुरबाज हा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. विशेषत: रहमानउल्ला गुरबाजला पॉवरप्ले ओव्हर्समध्ये रोखणे हे विरोधी गोलंदाजांसमोर मोठे आव्हान आहे. T20 विश्वचषक २०२४ मध्ये रहमानउल्ला गुरबाजने ४ सामन्यात १५० च्या स्ट्राईक रेटने १६७ धावा केल्या आहेत.

आत्तापर्यंत अफगाणिस्तान संघ टी-20 फॉर्मेटमध्ये भारताला पराभूत करू शकला नाही, परंतु आज अफगाण संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. सध्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजही आपली कामगिरी चोख बजावत आहेत.

रहमानउल्ला गुरबाज याची कारकीर्द 

रहमानउल्ला गुरबाजच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर ५९ टी-२० सामन्यांव्यतिरिक्त त्याने ४० वनडे आणि १ कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. रहमानउल्ला गुरबाजच्या नावावर टी-20 फॉरमॅटमध्ये १५४३ धावा आहेत.

तर या यष्टीरक्षक फलंदाजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये १४६४ धावा केल्या आहेत. याशिवाय रहमानउल्ला गुरबाजने आयपीएलच्या १४ सामन्यात २८९ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे आयपीएलमध्ये खेळण्याच्या अनुभवामुळे रहमानउल्ला गुरबाज आणि अफगाणिस्तानचे काम सोपे होईल, असे मानले जात आहे. मात्र, भारतीय संघाविरुद्ध अफगाणिस्तानची कामगिरी कशी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

WhatsApp channel