Afghanistan vs England, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी करत इंग्लंडचा धुव्वा उडवला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ ३१७ धावा करू शकला.
यादरम्यान अजमतुल्ला उमरझाई याने अफगाणिस्तानसाठी विक्रमी कामगिरी केली. त्याने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत उत्कृष्टता दाखवली. उमरझाईनेही एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
अफगाणिस्तानसाठी इब्राहिम झद्रान याने स्फोटक शतक झळकावले. त्याने १७७ धावांची खेळी खेळली. तर उमरझाईने ४१ धावा केल्या. ३१ चेंडूंचा सामना करताना त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला. यानंतर उमरझाईने गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली. त्याने ९.५ षटकात ५८ धावा देत ५ बळी घेतले. अफगाणिस्तानने हा सामना ८ धावांनी जिंकला.
उमरझाई आयसीसी वनडे टूर्नामेंटमधील एका सामन्यात अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने लाहोरमध्ये इंग्लंडविरुद्ध ५ विकेट घेतल्या होत्या. यापूर्वी २०१९ विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद नबीने ३० धावांत ४ बळी घेतले होते. श्रीलंकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. फजलहक फारुकीने २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये ४ विकेट घेतल्या होत्या.
अफगाणिस्तानने इंग्लंडचा ८ धावांनी पराभव केला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत हा सर्वात जवळचा विजय आहे. यापूर्वी भारताने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५ धावांनी विजय मिळवला होता. तर टीम इंडियाने २००२ मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध १० धावांनी विजय मिळवला होता.
अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटात आहे. तो दोन सामने खेळला आहे. या काळात एक जिंकला आणि एक हरला. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर त्याने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अफगाणिस्तानचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाशी असून हा सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे.
संबंधित बातम्या