मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AFG T20 : भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर, या १९ खेळाडूंना मिळाली संधी, पाहा

IND vs AFG T20 : भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर, या १९ खेळाडूंना मिळाली संधी, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 06, 2024 06:02 PM IST

Afghanistan T20 Squad against India : अफगाणिस्तानने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी (IND vs AFG T20 Series) १९ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

Afghanistan T20 Squad against India
Afghanistan T20 Squad against India (AFP)

india vs afganistan t20 series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. मालिका सुरू होण्याच्या ५ दिवस आधी अफगाणिस्तान संघाने आपला संघ (Afghanistan T20 Squad against India) जाहीर केला आहे.

टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा विचार करता ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

यामुळेच अफगाणिस्तानने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी १९ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

राशीद खान तिन्ही सामने खेळणार नाही

अफगाणिस्तानचा नियमित T20I कर्णधार रशीद खानचा भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये तो खेळताना दिसणार नाही. पाठीच्या शस्त्रक्रियेतून नुकताच तो बरा झाला आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. इब्राहिम झद्रान भारताविरुद्धच्या मालिकेत अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे. तर मुजीब उर रहमानचे पुन्हा एकदा संघात पुनरागमन झाले आहे. अलीकडेच UAE विरुद्ध झालेल्या ३ T20 सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती.

भारत दौऱ्यासाठी अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ - इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद. नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला T20- ११ जानेवारी- मोहाली

दुसरा T20- १४ जानेवारी- इंदूर

तिसरा T20- १७ जानेवारी- बेंगळुरू

भारत-अफगाणिस्तान टी-20 कोणत्या चॅनेल-अ‍ॅपवर दिसणार?

भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका स्पोर्ट्स18 – 1 (SD + HD) आणि स्पोर्ट्स 18 – 2 या चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच, भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग जियो सिनेमा अ‍ॅपवर पाहता येईल.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi