Afg Vs Zim : अफगाणिस्तानला मिळला नवा स्टार, रहमत शाहने झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावून इतिहास रचला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Afg Vs Zim : अफगाणिस्तानला मिळला नवा स्टार, रहमत शाहने झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावून इतिहास रचला

Afg Vs Zim : अफगाणिस्तानला मिळला नवा स्टार, रहमत शाहने झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावून इतिहास रचला

Dec 29, 2024 03:43 PM IST

Afg Vs Zim Test Scorecard : हमत शाहने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. रहमत शाहने संघाकडून 234 धावांची दमदार खेळी केली. या खेळीसह रहमत शाह अफगाणिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला.

Afg Vs Zim : अफगाणिस्तानला मिळला नवा स्टार, रहमत शाहने झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावून इतिहास रचला
Afg Vs Zim : अफगाणिस्तानला मिळला नवा स्टार, रहमत शाहने झिम्बाब्वेविरुद्ध द्विशतक झळकावून इतिहास रचला

Zimbabwe vs Afghanistan Scorecard : अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात एक वेगळाच थरार पाहायला मिळत आहे. हा सामना आता अनिर्णितकडे जात असल्याचे दिसत आहे. पण दोन्ही संघांच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. 

या सामन्यात झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना ५८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनीही दमदार कामगिरी करत संघाची धावसंख्या ५०० धावांच्या पुढे नेली आहे. आज चौथ्या दिवशीच्या लंचपर्यंत अफगाणिस्तानने ३ बाद ५०७ धावा केल्या आहेत.

विशेषतः रहमत शाह याची फलंदाजी अफगाणिस्तानसाठी उत्कृष्ट ठरली. अफगाणिस्तानकडून रहमत शाहने २३४ धावांची खेळी केली. या डावात रहमतने ४२४ चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये त्याने २३ चौकार आणि ३ षटकारही मारले.

यासह रहमत अफगाणिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे.

झिम्बाब्वेचे फलंदाज चमकले, गोलंदाज फ्लॉ

या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ५८६ धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेसाठी शॉन विल्यम्सने १७४ चेंडूत १५४ धावा, कर्णधार क्रेग एर्विनने १७६ चेंडूत १०४ धावा केल्या आणि ब्रायन बेनेटने १२४ चेंडूत नाबाद ११० धावा केल्या. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. पण गोलंदाजीत त्यांना काहीच करता आले नाही.

प्रत्युत्तरात अफगाण फलंदाजांनीही दमदार खेळ दाखवला. त्यांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवसात (२८ डिसेंबक) एकही विकेट पडू दिली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये हा पराक्रम इंग्लंडच्या जॅक हॉब्स आणि हर्बर्ट सटलिफ यांनी ९८ वर्षांपूर्वी केला होता. झिम्बाब्वेचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ दिसत होते.

त्यांच्याकडून ब्लेसिंग मुझाराबानी आणि ट्रेव्हर ग्वांडू यांनी प्रत्येकी एक बळी घेतला, मात्र १२५ षटके टाकूनही ते अफगाणिस्तानच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या