चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा १० वा सामना आज (२८ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करेल.
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या अगदी जवळ आहेत आणि एक विजय त्यांना अंतिम चारमध्ये घेऊन जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, ॲलेक्स केरी (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, सेदिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, रशीद खान, नूर अहमद, फजलहक फारुकी.
दरम्यान, या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला ब गटात ठेवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचे दोन सामन्यांत ३ गुण झाले असून ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेने एक सामना जिंकला, तर ऑस्ट्रेलियासोबतचा सामना अनिर्णित राहिला.
ऑस्ट्रेलिया संघाचेही दोन सामन्यांत ३ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रनरेट (०.४७५) दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तान संघाचे २ सामन्यांत २ गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट (-०.९९०) आहे. चौथ्या क्रमांकावर इंग्लिश संघ आहे. त्यांचे शुन्य गुण आहेत आणि ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
संबंधित बातम्या