मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  AFG vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची कारणं काय? हा ठरला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट, वाचा

AFG vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची कारणं काय? हा ठरला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट, वाचा

Jun 23, 2024 01:46 PM IST

AFG vs AUS T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाच्या पराभवामागे काही महत्त्वाची कारणे होती. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची बॅटिंग लाईन फ्लॉप झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर पहिला विजय आहे.

AFG vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची कारणं काय? हा ठरला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट, वाचा
AFG vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची कारणं काय? हा ठरला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट, वाचा (AP)

टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सुपर ८ फेरीत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला दणका दिला. रविवारी (२३ जून) अफगाणिस्तानने कांगारूंचा २१ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १२७ धावांवर सर्वबाद झाला.

ऑस्ट्रेलियाच्या पराभवामागे काही महत्त्वाची कारणे होती. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची बॅटिंग लाईन फ्लॉप झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर पहिला विजय आहे.

अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर सलामीला आले. हेड शून्यावर बाद झाला. तर वॉर्नर ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी त्यांना चांगली सुरुवात देऊ शकली नाही. त्यांच्या पराभवाचे हे महत्त्वाचे कारण होते. यानंतर कर्णधार मिचेल मार्शन १२ धावा करून बाद झाला तर मार्कस स्टोइनिस ११ धावा करून बाद झाला. सलामीच्या जोडीनंतर मधली फळीही फ्लॉप झाली. ग्लेन मॅक्सवेलशिवाय कोणीही चालले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

अफगाणिस्तानसाठी सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज (६०) आणि इब्राहिम झद्रान (५१) यांनी ११८ धावांची भागीदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मात्र, सलग दुसऱ्या सामन्यात कमिन्सने षटकांत हॅट्ट्रिक पूर्ण करत अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.

मॅक्सवेलची विके सर्वात मोठा टर्निंग पॉइंट

पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने ३२ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. मात्र ग्लेन मॅक्सवेलने ४१ चेंडूत ५९ धावा करत संघाला सामन्यात ठेवले. गुलबदीन नाइबने आपले गोलंदाजीचे ऑस्ट्रेलियावर दबाव आणला. यासह अफगाणिस्तानने गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात मुंबईतील पराभवाचा बदलाही घेतला. त्यावेळी मॅक्सवेलने अफगाणिस्तानकडून विजय हिसकावून घेतला होता आणि पुन्हा एकदा तो तेच करेल असे वाटत होते, पण गुलबदीनने नायबने त्यांचे मनसुबे उधळून लावले.

गुलबदीनने मॅक्सवेलला नूर अहमदकरवी झेलबाद केले. इथून सारा सामनाच फिरला. मॅक्सवेल शेवटपर्यंत टिकून राहिला असता तर ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकता आला असता. गुलबदिन नायबनेही मॅच विनिंग स्पेल टाकला. त्याने ४ षटकात २० धावा देत ४ बळी घेतले. मॅक्सवेल व्यतिरिक्त गुलबदीनने मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स आणि टीम डेव्हिड यांची शिकार केली. गुलबदीनने नायबला त्याच्या कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.

WhatsApp channel