रोहित शर्मा निवृत्त होणार, तर कोहली पुन्हा कर्णधार बनणार! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपूट असं का म्हणाला? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रोहित शर्मा निवृत्त होणार, तर कोहली पुन्हा कर्णधार बनणार! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपूट असं का म्हणाला? पाहा

रोहित शर्मा निवृत्त होणार, तर कोहली पुन्हा कर्णधार बनणार! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपूट असं का म्हणाला? पाहा

Jan 09, 2025 10:52 AM IST

Rohit Sharma Virat Kohli News : रोहित शर्माच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर रोहितच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची अटकळ वाढली आहे.

रोहित शर्मा निवृत्त होणार, तर कोहली पुन्हा कर्णधार बनणार! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपूट असं का म्हणाला? पाहा
रोहित शर्मा निवृत्त होणार, तर कोहली पुन्हा कर्णधार बनणार! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपूट असं का म्हणाला? पाहा (Hindustan Times)

Adam Gilchrist on Rohit and Kohli : टीम इंडियात सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन सर्वात अनुभवी क्रिकेटपटू आहेत. पण गेल्या काही काळापासन या दोघांच्या निवृत्तीची मागणी जोर धरू लागली आहे. बऱ्याच काळापासून दोघेही आऊट ऑफ फॉर्म आहेत. 

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्येही रोहित आणि कोहली काही खास करू शकले नाहीत. आता या सगळ्या दरम्यान ऑस्ट्रेलियन दिग्गज ॲडम गिलख्रिस्ट याने रोहित शर्माच्या निवृत्तीचा अंदाज वर्तवला आहे. तर विराट टीम इंडियाचा कर्णधार होईल, असे म्हटले आहे. 

रोहित शर्मा क्रिकेटला अलविदा करणार?

रोहित शर्माचा पहिला आयपीएल कर्णधार ॲडम गिलख्रिस्ट याला असा विश्वास आहे, की चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित कसोटी क्रिकेटमधूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही पूर्णपणे निवृत्त होऊ शकतो. 

'क्लब प्रेरी फायर' पॉडकास्टवर गिलख्रिस्ट म्हणाला, “मला वाटत नाही की रोहित इंग्लंड दौऱ्यावर जाईल. मायदेशी परतल्यानंतर तो आपल्या निर्णयाबाबत विचार करू शकतो. घरी परतल्यावर त्याचे स्वागत त्याची दोन महिन्यांची मुलगी करेल.  यानंतर तो तिची काळजी घेण्यासाठी मोठा वेळ देऊ इच्छितो.

"कदाचित तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शेवटचा आंतरराष्ट्री सामना खेळेल आणि नंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेईल."

विराट कोहली पुन्हा कर्णधार होणार?

ॲडम गिलख्रिस्टने भारतीय कसोटी संघाचा पुढील कर्णधार म्हणून विराट कोहलीचे नाव सुचवले. तो म्हणाला, “जसप्रीत बुमराहला पूर्णवेळ कर्णधार बनवणे मला योग्य वाटत नाही. वेगवान गोलंदाज असल्याने त्याच्यासाठी हे खूप आव्हानात्मक असू शकते. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाने पुन्हा विराटकडे कर्णधारपद सोपवल्यास आश्चर्य वाटणार नाही.

दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने बुमराहला कसोटी कर्णधार बनवण्याचे समर्थन केले. वॉन म्हणाला, “जसप्रीतने ऑस्ट्रेलियातील पर्थ आणि सिडनी कसोटीत चमकदार कामगिरी केली. त्याला दुखापत झाली नसती तर कदाचित भारताला तो सामना जिंकता आला असता. वॉनने शुभमन गिलला उपकर्णधार आणि भविष्यासाठी संभाव्य कर्णधार म्हणून तयार करण्याची सूचना केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या