Abhishek Sharma Times Shield Tournament : अभिषेक शर्मा याने नुकतेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये २८ चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला होता. आता तो पुन्हा एकदा त्याच्या झंझावाती खेळीमुळे चर्चेत आला आहे. याआधी त्याने टी-20 सामन्यात धडाकेबाज पद्धतीने शतक झळकावले होते, मात्र यावेळी त्याने कसोटी सामन्यात टी-20 सारखी फलंदाजी करत धुमाकूळ घातला आहे.
वास्तविक, देशात सध्या टाइम्स शील्ड स्पर्धा खेळली जात आहे, ज्यामध्ये पंजाबकडून खेळताना अभिषेक शर्माने २२ चेंडूत ६० धावांची शानदार खेळी केली आहे.
टाईम्स शील्ड स्पर्धेतील या सामन्यात अभिषेक शर्माने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याने वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकीपटू असो कोणालाच सोडले नाही.
टीम इंडियाकडून अभिषेकला बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत जास्त धावा करता आल्या नाहीत. पण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने आपली तुफानी शैली सोडली नाही आणि पंजाबकडून खेळताना २८ चेंडूत शतक झळकावले.
IPL २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी अभिषेक शर्माला सनरायझर्स हैदराबादने १४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. IPL २०२४ मध्ये त्याने SRH साठी १४ सामन्यांमध्ये ४८४ धावा केल्या होत्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता.
अभिषेक देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप सक्रिय आहे. आधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, आता टाइम्स शील्ड स्पर्धेत तो धुमाकूळ घालत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा अजून व्हायची आहे आणि रणजी हंगामाचा जवळपास अर्धा टप्पा बाकी आहे.
त्याला टीम इंडियामध्ये आणखी एक संधी मिळेल की नाही याबाबत फारशी आशा नाही कारण सलग संधी मिळूनही तो धावा करू शकला नाही. पण देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्याने त्याला पुन्हा भारतीय संघात प्रवेश मिळू शकतो.
संबंधित बातम्या