IND vs SA : आयपीएलचा शेर इंटरनॅशनलमध्ये ढेर! अभिषेक शर्मावर क्रिकेट चाहते संतापले, या प्रतिक्रिया पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA : आयपीएलचा शेर इंटरनॅशनलमध्ये ढेर! अभिषेक शर्मावर क्रिकेट चाहते संतापले, या प्रतिक्रिया पाहा

IND vs SA : आयपीएलचा शेर इंटरनॅशनलमध्ये ढेर! अभिषेक शर्मावर क्रिकेट चाहते संतापले, या प्रतिक्रिया पाहा

Nov 10, 2024 09:54 PM IST

Abhishek Sharma, IND vs SA 2nd T20 : भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा गेल्या काही सामन्यात अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. शतकानंतर त्याच्या धावांची संख्या घटली असून, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला खास काही करता आलेले नाही.

IND vs SA : आयपीएलचा शेर इंटरनॅशनलमध्ये ढेर! अभिषेक शर्मावर क्रिकेट चाहते संतापले, या प्रतिक्रिया पाहा
IND vs SA : आयपीएलचा शेर इंटरनॅशनलमध्ये ढेर! अभिषेक शर्मावर क्रिकेट चाहते संतापले, या प्रतिक्रिया पाहा (AP)

भारतीय टी-20 संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माला गेल्या काही डावात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. अभिषेकने आपल्या टी-20 इंटरनॅशनल करिअरच्या दुसऱ्याच डावात शतक झळकावले. पण त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अभिषेकच्या बॅटने धावा केल्या नाहीत आणि पॉवरप्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतला.

सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात ७ तर दुसऱ्या सामन्यात केवळ ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गेल्या सामन्यात चौथ्या षटकात आणि दुसऱ्या सामन्यात पहिल्याच षटकात तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

कारकिर्दीतील पहिले टी-२० शतक झळकावल्यानंतर अभिषेकने ८ डावात केवळ ७० धावा केल्या आहेत. अभिषेकने टी-20 इंटरनॅशनलमध्ये १० सामन्यात १७० धावा केल्या आहेत.

अशा परिस्थितीत अभिषेक टी-20 इंटरनॅशनलमध्ये अवांछित यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

अभिषेकची फलंदाजीची सरासरी केवळ १८.८८

अभिषेक शर्माने यावर्षीच झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियासाठी पदार्पण केले, ज्यामध्ये तो त्याच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. तर दुसऱ्या सामन्यात त्याने ४७ चेंडूत १०० धावा काढल्या.

तेव्हापासून, अभिषेकची बॅट सतत शांत दिसत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या शेवटच्या ७ T20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये केवळ ७० धावा करू शकला आहे. या कालावधीत, त्याची सर्वोच्च धावसंख्या ही केवळ १६ धावा आहे, जी ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत आली होती.

यानंतर अभिषेक शर्माच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. तो आता असा खेळाडू बनला आहे, ज्याची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावल्यानंतरही सर्वात कमी फलंदाजी सरासरी आहे. अभिषेकची फलंदाजीची सरासरी सध्या केवळ १८.८८ आहे, ज्यामध्ये त्याने केविन ओब्रायनला मागे टाकले आहे.

टी-20 शतक करून सर्वात कमी फलंदाजीची सरासरी असलेले खेळाडू

अभिषेक शर्मा - १८.८८

केविन ओब्रायन - २१.२१

रिचर्ड लेव्ही - २१.४५

Whats_app_banner