Abhishek Sharma Injury Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज (२५ जानेवारी) चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या घोट्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला टी-20 सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अभिषेकचा घोटा कॅच प्रॅक्टिस दरम्यान त्याचा पाय मुरगळला. त्यानंतर फिजिओथेरपिस्टने त्याला काळजी घेण्यासा सांगितले आहे.
अभिषेक शर्मा ड्रेसिंग रूमच्या दिशेने लंगडत जाताना दिसला. या घटनेनंतर तो पुन्हा नेटवर सरावाला परतला नाही. अभिषेक शर्मा फिजिओसोबत ड्रेसिंग रूममध्ये जवळपास अर्धा तास बसल्याचे वृत्त आहे.
अभिषेक शर्माने पहिल्या T20 सामन्यात केवळ ३४ चेंडूत ७९ धावांची शानदार खेळी केली होती. त्याने टीम इंडियाला ७ विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दरम्यान, आता अभिषेक शर्मा दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशा स्थितीत तो प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल की नाही, हे सामन्याच्या काही वेळपूर्वीच ठरवले जाणार आहे. अभिषेक शर्मा खेळला नाही तर संजू सॅमसन याला सलामीचा नवा जोडीदार मिळू शकतो.
तसेच, या सामन्यात टीम इंडिया काही बदलांसह मैदानावर उतरू शकते. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला संधी दिली जाऊ शकते. अशा स्थितीत लेगस्पिनर रवी बिश्नोईला वगळले जाऊ शकते. उर्वरित अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती खेळणार हे निश्चित आहे.
दुसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - अभिषेक शर्मा/ध्रुव जुरेल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी/रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडने एक दिवस आधीच दुसऱ्या टी-२० साठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केले होते. दुसऱ्या सामन्यात इंग्लिश संघात एक बदल झाला आहे. वेगवान गोलंदाज गस एटकिन्सन याच्या जागी ब्रायडन कार्स खेळणार आहे.
दुसऱ्या T20 साठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वुड.
संबंधित बातम्या