मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  करिअरच्या दुसऱ्याच सामन्यात अभिषेक शर्मानं स्वत:चं रेकॉर्ड बुक बनवलं, रोहित-विराटला जमलं नाही ते करून दाखवलं

करिअरच्या दुसऱ्याच सामन्यात अभिषेक शर्मानं स्वत:चं रेकॉर्ड बुक बनवलं, रोहित-विराटला जमलं नाही ते करून दाखवलं

Jul 07, 2024 08:29 PM IST

भारताने दुसऱ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेचा १०० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. करिअरचा दुसराच सामना खेळणाऱ्या अभिषेक शर्माने विक्रमांचा पाऊस पाडला आहे.

Abhishek Sharma करिअरच्या दुसऱ्याच सामन्यात अभिषेक शर्मानं स्वत:चं रेकॉर्ड बुक बनवलं, रोहित-विराटला जमलं नाही ते करून दाखवलं
Abhishek Sharma करिअरच्या दुसऱ्याच सामन्यात अभिषेक शर्मानं स्वत:चं रेकॉर्ड बुक बनवलं, रोहित-विराटला जमलं नाही ते करून दाखवलं (AFP)

भारताने दुसऱ्या T20 सामन्यात (६ जुलै) झिम्बाब्वेचा १०० धावांनी पराभव केला. यासह ५ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया १-१ ने बरोबरीत आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांत २ बाद २३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला १८.४ षटकांत १३४ धावाच करता आल्या.

भारतीय संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. शर्माने रविवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ ४६ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले.

डावखुरा फलंदाज ४७ चेंडूत १०० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेकच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २ गडी गमावून २३४ धावा केल्या होत्या.

ट्रेंडिंग न्यूज

पंजाबच्या अभिषेक शर्माने हरारे येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ३३ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. आपले अर्धशतक पूर्ण करताच अभिषेकने आक्रमक पवित्रा घेत पुढील १३ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

सर्वात कमी डाव खेळून आंतरराष्ट्रीय शतक

अभिषेक शर्मा हा सर्वात कमी डावात टी-20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. शर्माने कारकिर्दीतील दुसऱ्याच डावात शतक झळकावले. त्याने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसऱ्या डावात शतक झळकावणाऱ्या दीपक हुडाचा विक्रम मोडला.

सर्वात कमी डावात T20I शतके झळकावणारे भारतीय

२ डावात* - अभिषेक शर्मा (आज) ६ जुलै २०२४

३ - दीपक हुडा

४ - केएल राहुल

६ - शुभमन गिल

६ - यशस्वी जैस्वाल

१२- सुरेश रैना

१५- ऋतुराज गायकवाड

झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 शतक करणारा पहिला भारतीय

अभिषेक शर्मा हा झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यासह, भारतीय संघाने पाकिस्तान वगळता T20 आंतरराष्ट्रीय स्वरूपातील सर्व पूर्णवेळ सदस्यांविरुद्ध शतक झळकावण्याची अनोखी कामगिरी केली.

शतक झळकावणारा चौथा सर्वात युवा भारतीय फलंदाज

अभिषेक शर्मा T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा चौथा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. शर्माने वयाच्या २३ वर्षे ३०७ दिवसांत टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. तसे, T20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाजाचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. यशस्वीने २०२३ मध्ये वयाच्या २१ वर्षे २७९ दिवसात नेपाळविरुद्ध शतक झळकावले होते.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक झळकावणारे सर्वात युवा भारतीय

२१ वर्षे आणि २७९ दिवस - यशस्वी जैस्वाल विरुद्ध नेपाळ, २०२३

२३ वर्षे आणि १४६ दिवस - शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, २०२३

२३ वर्षे १५६ दिवस - सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१०

२३ वर्षे ३०७ दिवस - अभिषेक शर्मा विरुद्ध झिम्बाब्वे, ६ जुलै २०२४

अभिषेक विशेष क्लबमध्ये सामील

रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावून अभिषेक शर्मा एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे. शर्मा हा झिम्बाब्वेमध्ये T20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा जगातील तिसरा आणि भारताकडून पहिला खेळाडू ठरला. याआधी ऑस्ट्रेलियाच्या ॲरॉन फिंच आणि स्टीव्हन टेलरने हा पराक्रम केला होता.

झिम्बाब्वेमध्ये T20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारे खेळाडू

ॲरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध झिम्बाब्वे, २०१८

स्टीव्हन टेलर (यूएसए) वि जर्सी, २०२२

अभिषेक शर्मा (भारत) विरुद्ध झिम्बाब्वे, आज

अभिषेक शर्मा दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील झाला

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावणारा अभिषेक शर्मा जगातील पाचवा खेळाडू ठरला. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याने झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधील पहिले शतक झळकावले.

झिम्बाब्वेविरुद्ध T20I शतक झळकावणारे खेळाडू

महेला जयवर्धने (श्रीलंका), २०१०

मोहम्मद शहजाद (पाकिस्तान), २०१६

ॲरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया), २०१८

पॉल स्टर्लिंग (आयर्लंड), २०२१

अभिषेक शर्मा (भारत), २०२४*

केएल राहुलची बरोबरी

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत अभिषेक शर्मा केएल राहुलच्या बरोबरीने पोहोचला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत अभिषेक आणि केएल राहुल संयुक्तपणे भारतासाठी तिसरे स्थान राखून आहेत.

T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय

३५ - रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, २०१७

४५ - सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रीलंका, २०२३

४६ - केएल राहुल विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१६

३६ - अभिषेक शर्मा विरुद्ध झिम्बाब्वे, २०२४*

WhatsApp channel