इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ चॅम्पियन ठरला. कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात सहयोगी प्रशिक्षक अभिषेक नायर यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. अनेक खेळाडूंनी केकेआर चॅम्पियन होण्यामागे अभिषेक नायर यांचा हात असल्याचे सांगितल होते.
दरम्यान अभिषेक नायर हे आजकाल त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. अभिषेक नायर हे अलीकडेच एका पॉडकास्ट मुलाखतीत दिसले. या मुलाखतीत त्यांना क्रिकेटशिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि या खेळाशी संबंधित अनेक गोष्टी विचारण्यात आल्या.
या मुलाखतीत अभिषेक नायर यांना सेक्सबाबतही प्रश्न विचारण्यात आला. मुलाखत घेणाऱ्याने विचारले की, अभिषेक, क्रिकेटमध्ये सेक्स हा खेळाडूंच्या जीवनाचा एक पैलू आहे का? याला उत्तर देताना अभिषेक नायर म्हणाले, 'तुम्ही हे सकारात्मक विचारताय की नकारात्मक? तुम्ही खूप मोकळा प्रश्न विचारला आहे. हे तर होणारच. कोणतीही व्यक्ती त्याशिवाय कशी जगेल, पण तो चांगला की वाईट हा तुमचा प्रश्न आहे.
ते म्हणाले, 'मला याचे उत्तर द्यायचे आहे, पण हे सांगितल्यानंतर तुमचे उत्तर काय आहे ते पहायचे आहे. हे कोणासाठीही सामान्य आहे. ते प्रत्येकासाठी वेगळे असते. प्रत्येक क्रिकेटपटूच्या मनात याबाबत सतत संघर्ष आणि संभ्रम असतो. काहींना ते आवडते, काही जण दूर राहतात, त्यामुळे यासाठी कोणताही एक नियम नाही".
कोलकाता नाईट रायडर्ससाठी युवा भारतीय खेळाडू तयार करण्यात अभिषेक नायर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सहाय्यक प्रशिक्षक असण्यासोबतच अभिषेक केकेआर अकादमीचे मेंटर आणि मुख्य प्रशिक्षक देखील आहेत. असाच एक युवा खेळाडू आहे १८ वर्षांचा अंगक्रीश रघुवंशी त्याचे वडील अवनीश यांनी नायरचे इंस्टाग्रामवर आभार मानले आहेत.
त्यांनी लिहिले, 'प्रिय अभिषेक नायर सर, तुम्ही आम्हाला सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे मला अंगक्रीशला आधी एक चांगला माणूस बनवायचा आहे आणि नंतर क्रिकेटपटू बनवायचा आहे... तुमची योजना काम करत आहे असे दिसते.'