मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  कोणी जावो अथवा न जावो, श्री रामांसाठी मी आयोध्येला जाणारच, हरभजन सिंगनं स्पष्टच सांगितलं

कोणी जावो अथवा न जावो, श्री रामांसाठी मी आयोध्येला जाणारच, हरभजन सिंगनं स्पष्टच सांगितलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 20, 2024 09:00 PM IST

Harbhajan Singh On Ram Mandir : क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा राज्यसभा खासदार हरभजन सिंग याने कोणी जावो अथवा न जावो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आयोध्येला जाणारच, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

Harbhajan Singh On Ram Mandir
Harbhajan Singh On Ram Mandir (HT_PRINT)

भारतीय क्रिकेट संघाचे महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंना २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले आहे.

तर दुसरीकडे क्रिकेटपटू आणि आम आदमी पक्षाचा राज्यसभा खासदार हरभजन सिंग याने कोणी जावो अथवा न जावो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आयोध्येला जाणारच, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

वास्तविक, अनेक राजकीय पक्षांंनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारले आहे. यानंतर हरभजन सिंगचे हे वक्तव्य आले असून याची प्रचंड चर्चा होत आहे. यावेळी, 'आज मी जो काही आहे तो देवाच्या आशीर्वादामुळेच असल्याचेही हरभजनने स्पष्ट केले.

हरभजन म्हणाला, की ‘हे मंदिर आता बांधले जात आहे हे आपले भाग्य आहे, त्यामुळे आपण सर्वांनी जाऊन आशीर्वाद घ्यावा, कोणीही जाईल किंवा नाही जाईल. पण मात्र, नक्की जाणार आहे. कारण माझा देवावर विश्वास आहे.’

भज्जीने काँग्रेसला टोला लगावला, इतर पक्षांनाही टार्गेट केले

यादरम्यान हरभजन सिंग याने कॉंग्रेससह इतर पक्षांना फटकारले आहे. म्हणाला की, काँग्रेसला जायचे असेल तर जावे, नाही तर न जावो. पण माझ्या राम मंदिरात जाण्याबाबत कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी हवे ते करू शकतात. माझा देवावर विश्वास आहे, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते देवाची कृपा आहे, मी नक्कीच आशीर्वाद घेण्यासाठी जाईन.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणेवरून देशात राजकारण सुरू आहे, प्रत्यक्षात या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि आपसह विरोधी पक्ष करत आहेत.

WhatsApp channel