श्रीलंकेचा माजी दिग्गज महेला जयवर्धने याचे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मार्क बाऊचर याला या पदावरून हटवण्यात आले आहे. बाऊचरच्या जागी महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक असेल. याआधीही महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होता.
महेला जयवर्धनेचा मुंबई इंडियन्ससोबतचा कार्यकाळ खूप यशस्वी ठरला आहे. महेला जयवर्धनेच्या प्रशिक्षणात मुंबई इंडियन्सने तीन वेळा विजेतेपद पटकावले.
दरम्यान, आता माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने महेला जयवर्धनेच्या मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सची रणनीती काय असेल? हे चोप्राने सांगितले आहे.
आकाश चोप्रा म्हणाला, की महेला जयवर्धनेचे पुनरागमन हे सूचित करते की मुंबई इंडियन्स जास्तीत जास्त ६ खेळाडूंना रिटेन करेल. तो म्हणाला की, मुंबई इंडियन्सने आपल्या ६ खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी ७९ कोटी रुपये खर्च केले तर त्यात काही गैर नाही, तुम्ही तुमचे ६ सर्वोत्तम खेळाडू कायम ठेवाल.
मुंबई इंडियन्सला त्यांचे ५ सर्वोत्तम खेळाडू कायम ठेवायचे आहेत. तसेच, ते युवा खेळाडू नेहल वढेरा यालाही संघात ठेवतील. आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, मुंबई इंडियन्समध्ये बदल सुरू झाले आहेत. महेला जयवर्धने परतला आहे.
मुंबई इंडियन्स ६ खेळाडूंना का रिटेन करणार?
आकाश चोप्राने सांगितले की, मुंबई इंडियन्स कोणत्याही किंमतीत आपला गाभा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या संघात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि इशान किशनसारखे खेळाडू आहेत.
यानंतर अनकॅप्ड खेळाडूंमध्ये नेहल वढेरासारखे नाव आहे. तो म्हणाला की मुंबई इंडियन्सने आपला गाभा टिकवण्यासाठी ७९ कोटी रुपये खर्च केले तर तो वाईट पर्याय नाही. तुमच्याकडे सर्व नावे आहेत जी भारतीय आहेत आणि प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील.
संबंधित बातम्या