टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी ९ अंक ठरतोय लकी, रोहित विराटसह सूर्या-संजूचं नशीब चमकलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी ९ अंक ठरतोय लकी, रोहित विराटसह सूर्या-संजूचं नशीब चमकलं

टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी ९ अंक ठरतोय लकी, रोहित विराटसह सूर्या-संजूचं नशीब चमकलं

Jan 16, 2025 04:29 PM IST

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंसाठी ९ हा अंक खूपच लकी ठरला आहे. अनेक क्रिकेटपटूंच्या जर्सीवरील क्रमांकाची बेरीज केल्यास उत्तर ९ येते. तर संजू सॅमसन ९ क्रमांकाची जर्सी घालून खेळतो. त्याने टी-20 मध्ये एका वर्षात तीन शतकं ठोकली आहेत.

टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी ९ अंक ठरतोय लकी, रोहित विराटसह सूर्या-संजूचं नशीब चमकलं
टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी ९ अंक ठरतोय लकी, रोहित विराटसह सूर्या-संजूचं नशीब चमकलं

Team India Jersey Number 9 : भारतीय क्रिकेट संघात खेळणाऱ्या अनेक खेळाडूंसाठी ९ क्रमांक खूपच लकी ठरला आहे. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली, सूर्यकुमार यादव, स्फोटक विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या जर्सीचा क्रमांक ९ आहे किंवा या खेळाडूंच्या जर्सीवरील क्रमांकाची बेरीज केल्यास ९ आकडा मिळतो.

रोहित शर्मा जर्सी क्रमांक ४५ (४+५=९)

कर्णधार रोहित शर्मा ४५ क्रमांकाची जर्सी घालतो. या दोन अंकांची बेरीज केल्यास उत्तर ९ येते. जेव्हा रोहितने आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा तो ७७ क्रमांकाची जर्सी घालून खेळत असे. या दिग्गज व्यक्तीला त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत फारसे यश मिळाले नाही, परंतु ४५ नंबरची जर्सी परिधान करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने प्रचंड यश मिळवले.

विराट कोहली जर्सी क्रमांक १८ (१+८=९)

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली कारकिर्दीच्या सुरुवातीपासून १८ क्रमांक असलेली जर्सी घालून खेळतो. त्याच्या जर्सी क्रमांकाच्या दोन क्रमांकांची बेरीजही ९ आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवलेले यश कोणापासूनही लपलेले नाही.

आर अश्विन जर्सी क्रमांक ९९

आर अश्विनची गणना जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये केली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये हा दिग्गज गोलंदाज भारताकडून सर्वात वेगवान ५०० बळी घेणारा गोलंदाज आहे. श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरननंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या जर्सीचा क्रमांक ९९ आहे. 

सूर्यकुमार यादव जर्सी क्रमांक ६३ (६+३=९)

टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने या फॉरमॅटमध्ये प्रचंड यश मिळवले आहे. सूर्याच्या जर्सीचा क्रमांक ६३ आहे आणि या दोन अंकाची बेरीज केल्या उत्तर ९ येते.

संजू सॅमसन जर्सी क्रमांक ९

संजू सॅमसनच्या सुरुवातीच्या काळात १४ नंबर असलेली जर्सी घालून खेळायचा. आता तो ९ नंबरची जर्सी घालून खेळतो. अलीकडच्या काळात त्याने T20 मध्ये चमकदार कामगिरी केली असून ३ शतके झळकावली आहेत. एका वर्षात अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. 

तिलक वर्मा जर्सी जर्सी क्रमांक ७२ (७+२=९)

भारतीय संघाचा नवा स्टार तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत सलग दोन सामन्यांत शतके झळकावली. या युवा खेळाडूचा जर्सी क्रमांक ७२ असून या दोन अंकांची बेरीज ९ होते.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या