गुजरात-आरसीबीच्या फलंदाजांनी ४०३ धावा ठोकल्या, WPL च्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  गुजरात-आरसीबीच्या फलंदाजांनी ४०३ धावा ठोकल्या, WPL च्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला

गुजरात-आरसीबीच्या फलंदाजांनी ४०३ धावा ठोकल्या, WPL च्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला

Updated Feb 15, 2025 12:07 PM IST

Gujarat Giants Vs Royal Challengers WPL 2025 : महिला प्रीमियर लीग २०२५ ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील मोसमातील पहिला सामना संस्मरणीय ठरला. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४०३ धावा करून अनेक विक्रम मोडले.

गुजरात-आरसीबीच्या फलंदाजांनी ४०३ धावा ठोकल्या, WPL च्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला
गुजरात-आरसीबीच्या फलंदाजांनी ४०३ धावा ठोकल्या, WPL च्या पहिल्याच सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला (AFP)

वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या मोसमातील पहिला सामना (१४ फेब्रुवारी) गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला. बडोद्याच्या कोटम्ही स्टेडियवर प्रथम फलंदाजी  करताना गुजरातने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात २०१ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात खराब सुरुवात होऊनही आरसीबीने ९ चेंडू शिल्लक असताना एवढे मोठे लक्ष्य गाठले.

संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. वडोदरातील कोटंबी स्टेडियमवर फलंदाजांनी सहज धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात विक्रमांचा पाऊस पडला. 

सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग

महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम मोडला गेला आहे. मुंबई इंडियन्सने २०२४ मध्ये गुजरातविरुद्धचा सामना १९१ धावा करून जिंकला होता. आता २०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा आरसीबी WPLचा पहिला संघ ठरला आहे.

एका सामन्यात सर्वाधिक धावा

लीगच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला गेला आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण ४०३ धावा केल्या. याआधीही हा विक्रम याच दोन संघांच्या नावावर होता. २०२३ मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात आणि RCB यांच्यातील सामन्यात ३९१ धावा झाल्या होत्या.

एका फलंदाजाचे सर्वाधिक षटकार

गुजरात जायंट्सची कर्णधार ऍशले गार्डनर हिची बॅट जोरदार बोलली. तिने ३७ चेंडूत ७९ धावांची तुफानी नाबाद खेळी खेळली. या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने तिच्या इनिंगमध्ये ८ षटकार ठोकले. यासह तिने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सोफी डिव्हाईनची बरोबरी केली.

लीगमधील चौथे जलद अर्धशतक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ऋचा घोषने शानदार फलंदाजी केली. तिने केवळ २३ चेंडूत अर्धशतक केले. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील हे चौथे जलद अर्धशतक आहे. २७ चेंडूत ६४ धावा करून ती नाबाद राहिली. ऋचाने षटकार मारून सामना संपवला.

सर्वात जलद ५०+ धावांची भागीदारी

गुजरातसाठी गार्डनर आणि डिएंड्रा डॉटिनल यांनी चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. या दोघींनी केवळ ३१ चेंडूंचा सामना केला. या काळात संघाची धावगती १२.९६ इतका होता. गुजरातसाठी लीगमधील ही सर्वात जलद ५० हून अधिक धावांची भागीदारी आहे.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या