मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  गिल-जैस्वाल ते ऋतुराज-सॅमसन… टी-20 मध्ये सलामीच्या दोन जागांसाठी टीम इंडियाच्या ५ फलंदाजांमध्ये चुरस, पाहा

गिल-जैस्वाल ते ऋतुराज-सॅमसन… टी-20 मध्ये सलामीच्या दोन जागांसाठी टीम इंडियाच्या ५ फलंदाजांमध्ये चुरस, पाहा

Jul 10, 2024 10:13 PM IST

अभिषेकच्या आधी यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड यांचा विचार केला जाईल. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर, सलामीच्या दोन स्थानांसाठी ५ दावेदार आहेत.

गिल-जैस्वाल ते ऋतुराज-सॅमसन… टी-20 मध्ये सलामीच्या दोन जागांसाठी टीम इंडियाच्या ५ फलंदाजांमध्ये चुरस, पाहा
गिल-जैस्वाल ते ऋतुराज-सॅमसन… टी-20 मध्ये सलामीच्या दोन जागांसाठी टीम इंडियाच्या ५ फलंदाजांमध्ये चुरस, पाहा

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने शतक झळकावले. त्याच्या कारकिर्दीतील हा केवळ दुसरा सामना होता. आयपीएलमध्ये खळबळ माजवल्यानंतर अभिषेकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चांगली सुरुवात केली आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यात शतक झळकावल्यानंतरही संघात स्थान पक्के करणे त्याच्यासाठी सोपे नाही.

कारण आज (१० जुलै) तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये यशस्वी जैस्वालच्या पुनरागमनानंतर अभिषेक शर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागले. म्हणजेच, अभिषेकच्या आधी यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड यांचा विचार केला जाईल.

अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर, सलामीच्या दोन स्थानांसाठी ५ दावेदार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

यशस्वी जैस्वाल

यशस्वी जैस्वालची टी-20 विश्वचषक संघात सलामीवीर म्हणून निवड झाली. झिम्बाब्वे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला विश्रांती देण्यात आली होती. यशस्वी संघात असता तर कदाचित अभिषेकला ही संधी मिळाली नसती. भारतासाठी १७ टी-20 सामन्यांमध्ये ५४० धावा करणारा यशस्वी जैस्वाल टीम इंडियाचा पुढचा नियमित सलामीवीर होऊ शकतो.

शुभमन गिल

शुभमन गिलही सलामीवीर आहे. यशस्वी जैस्वालने एका ओपनिंग स्लॉटवर आपले स्थान निश्चित केले तर दुसऱ्यासाठी अभिषेक शर्माला त्याचा जवळचा मित्र शुभमन गिल याच्याशी टक्कर द्यावी लागेल. टी-20 विश्वचषकाला अजून दोन वर्षे बाकी आहेत आणि अशा परिस्थितीत गिललाही आपले स्थान पक्के करायला आवडेल.

ऋतुराज गायकवाड

ऋतुराज झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या आणि आज चौथ्या क्रमांकावर खेळला. पण जेव्हा पंत, सूर्या आणि हार्दिक सारखे खेळाडू परततील तेव्हा सुरुवातीच्या स्लॉटमध्ये ऋतुराजलाच जागा मिळू शकते. या मालिकेपूर्वी त्याने भारतासाठी सलामीवीराची भूमिका साकारली होती. अशा परिस्थितीत अभिषेकला त्याच्याविरुद्धही स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.

संजू सॅमसन

टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात भारताने सलामीवीर म्हणून संजू सॅमसनला मैदानात उतरवले होते. यापूर्वीही त्याने या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सलामी दिली आहे. असो, सर्व प्रमुख खेळाडू परतल्यानंतर सलामीच्या स्लॉटमध्ये संजूसाठीही जागा आहे, असे यावरून स्पष्ट होते. अशा परिस्थितीत अभिषेकचा पुढचा मार्ग सोपा नसेल.

ईशान किशन

या वर्षाच्या सुरुवातीला, ईशान किशन आणि बीसीसीआयमधील वादाची बातमी येण्यापूर्वी, ईशान टी-20 मध्ये भारताचा सलामीवीर होता. भारताकडून खेळलेल्या शेवटच्या ३ टी-२० सामन्यांमध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. ईशानही पुनरागमन करू शकतो. त्यालाही अभिषेकपेक्षा जास्त अनुभव आहे.

WhatsApp channel