5 Indian Cricketers Who Worked In Bank : भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेशसह अनेक देशांमध्ये क्रिकेटपटूंना बक्षीस म्हणून सरकारी नोकऱ्या दिल्या जातात. चांगल्या पगारासह या नोकर्या सामान्यतः प्रतिष्ठित मानल्या जातात. याव्यतिरिक्त, या देशांची सरकारे क्रिकेटला एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रतीक म्हणून पाहतात. यशस्वी क्रिकेटपटूंना नोकरी देणे हा खेळाचा प्रचार करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा पाच भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे सरकारी बँकांमध्ये काम करतात.
केएल राहुल हा भारतीय रिझर्व्ह बँकेत भारत सरकारच्या उपक्रमात सहाय्यक व्यवस्थापक आहे. त्याने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत असे म्हटले होते की आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्यापेक्षा त्याला आरबीआयमध्ये नोकरी मिळाल्याने त्याचे पालक अधिक आनंदी होते.
ईशान किशन हा व्यावसायिक क्रिकेटपटू असण्यासोबतच रिझर्व्ह बँकेचा कर्मचारी आहे. ईशानला आरबीआय पटनामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली, तो २०१७ मध्ये या पदावर रुजू झाला.
दीपक हुडालादेखील आपल्या सहकारी क्रिकेटपटूंप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळाली आहे.
विदर्भ एक्सप्रेस उमेश यादव याला २०१७ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. उमेशने पोलीस कॉन्स्टेबल पदासाठीही तयारी केली होती. सोबतच २००८ मध्ये जेव्हा उमेशला पहिल्यांदा विदर्भ कॅम्पमध्ये बोलावण्यात आले, तेव्हा त्याचे तत्कालीन कॅप्टन प्रीतम गांधी त्याला थेट एअर इंडियात घेऊन गेले जिथे त्याला पहिला करार मिळाला. मात्र, चांगली कामगिरी करूनही एअर इंडियाने त्याला नोकरी दिली नाही.
भारतासाठी दोन कसोटी सामने खेळलेला शाहबाज नदीम हे आयपीएलमधील मोठे नाव आहे. स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजीसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक बळी घेणाऱ्या या खेळाडूला क्रीडा कोट्यातून भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीही मिळाली. बिहारमध्ये जन्मलेला हा खेळाडू झारखंडकडून रणजी ट्रॉफी खेळतो. त्याचे वडील जावेद मेहमूद काही वर्षांपूर्वी डीएसपी पदावरून निवृत्त झाले आहेत.