धोनी-युवी खास मित्र कसे बनले? खेळाडूंनी गांगुलीला एप्रिल फुल कसं बनवलं? ड्रेसिंग रूममधील भन्नाट किस्से, वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  धोनी-युवी खास मित्र कसे बनले? खेळाडूंनी गांगुलीला एप्रिल फुल कसं बनवलं? ड्रेसिंग रूममधील भन्नाट किस्से, वाचा

धोनी-युवी खास मित्र कसे बनले? खेळाडूंनी गांगुलीला एप्रिल फुल कसं बनवलं? ड्रेसिंग रूममधील भन्नाट किस्से, वाचा

Dec 25, 2024 08:33 PM IST

Indian Cricket Dressing Room : खेळाडूंच्या ड्रेसिंगममध्ये किस्से ऐकायला चाहत्यांना नेहमीच आवडते. अशा स्थितीत आपण येथे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील ५ मजेशीर किस्से जाणून घेणार आहोत.

धोनी-युवी खास मित्र कसे बनले? खेळाडूंनी गांगुलीला एप्रिल फुल कसं बनवलं? ड्रेसिंग रूममधील भन्नाट किस्से, वाचा
धोनी-युवी खास मित्र कसे बनले? खेळाडूंनी गांगुलीला एप्रिल फुल कसं बनवलं? ड्रेसिंग रूममधील भन्नाट किस्से, वाचा

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधले वातावरण कसे असते आणि त्यामधील गंमती जंमती ऐकायला चाहत्यांना खूप आवडते. कधीकधी क्रिकेटपटूंच्या मुलाखतीतूनही ड्रेसिंग रूममधीस मजेशीर किस्से बाहेर येतात. असे किस्से क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करून राहतात. अशा स्थितीत आपण येथे असेच काही किस्से जाणून घेणार आहोत.

हा किस्सा १९७१ चा आहे. जेव्हा फारुख इंजिनियर आणि सुनील गावस्कर यांची रेस्ट ऑफ वर्ल्ड संघात निवड झाली होती. रेस्ट ऑफ वर्ल्ड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होता. 

फारूख इंजिनियर शुन्यावर बाद झाले

या सामन्यादरम्यान गावसकर जेव्हा फलंदाजीला जात होते, तेव्हा फारूख इंजिनियर म्हणाले की, लवकर बाद होऊ नकोस, कारण मेलबर्नचे पॅव्हेलियन खूप दूर आहे. 

पण यातील गंमत म्हणजे गावसकरांना लवकर बाद न होण्याचा सल्ला देणारे फारूख इंजिनियर हेच शून्यावर आऊट होऊन परतले. 

गांगुलीने युवीला ओपनिंगला जायला सांगितलं

ही घटना २००० साली आयसीसी नॉकआऊट स्पर्धेत घडली होती. युवराजचा हा पदार्पणाचा सामना होता. संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने सामन्याच्या एक दिवस आधी युवीला विचारले, 'तू ओपन करशील का?' युवी हो म्हणाला, पण मनातल्या गोंधळामुळे तो रात्रभर त्रस्त राहिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पॅड घालून फलंदाजीला जाण्यास तयार होता तेव्हा त्याला कळले की गांगुलीने त्याच्यासोबत प्रँक केला होता.

गांगुलीला खेळाडूंनी एप्रिल फुल बनवले

ही घटना खूप खास आहे. वर्ष २००५ च्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेदरम्यान सर्व भारतीय क्रिकेटपटूंनी आपला कर्णधार सौरव गांगुलीसोबत प्रँक करण्याचा प्लॅन बनवला. याचा मास्टरमाईंड हरभजन सिंग होता. 

प्लॅननुसार गांगुलीवर खेळाडूंची तक्रार केल्याचा खोटा आरोप लावण्यात आला. यानंतर सर्व खेळाडूंनी याबाबत गांगुलीला घेरले आणि जाब विचारण्यास सुरुवात केली. गांगुली या गोष्टी चुकीच्या असल्याचे सांगत राहिला पण खेळाडू ऐकायला तयार नव्हते, यानंतर गांगुलीने आपण कर्णधार पद सोडतो असे सांगितले. शेवटी राहुल द्रविडने आज एक एप्रिल आहे आणि हा प्रँक असल्याचे सांगितले.

सचिनच्या भाषणाने खेळाडूंमध्ये जोश आला

हा किस्सा २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यानंतर भारताचे सर्व फलंदाज चिंतेत होते. अशा स्थितीत सचिनने ड्रेसिंग रुममध्ये संस्मरणीय भाषण केले.

तो म्हणाला, 'आपण प्रत्येक षटकात चौकार मारू शकतो का? जर होय असेल तर आपण ५० चेंडूत २०० धावा सहज करू शकतो. सचिनने हा किस्सा समालोचक हर्षा भोगले यांच्यासोबत शेअर केला होता. दरम्यान, हा सामना जिंकण्यात भारताला यश आले नाही.

धोनी-युवी खास मित्र बनले

हा किस्सा महेंद्रसिंह धोनी नवा-नवा टीम इंडियात आला होता, तेव्हाचा आहे. ड्रेसिंग रुममधील बहुतेक क्रिकेटपटू त्याला 'बिहारी' म्हणत त्याची खिल्ली उडवत असत. यात युवराज सिंग आघाडीवर होता, तो धोनीला सतत चिडवत असे की, जर तु एखादी मोठी खेळी खेळून संघाला विजय मिळवून दिला नाही तर सर्व व्यर्थ आहे. 

धोनीने एकदिवसीय सामन्यात स्वत:ला सिद्ध केल्यावर तो म्हणू लागला की, आता कसोटीत स्वत:ला सिद्ध करून दाखव. शेवटी एक दिवस धोनीने युवीला विचारले की तू मला वारंवार का त्रास देतोस. धोनीच्या या अशा विचारण्यानंतर दोघे खूप चांगले मित्र बनले.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या