Most Runs In An Over: एका षटकात दिल्या ४३ धावा; या गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Most Runs In An Over: एका षटकात दिल्या ४३ धावा; या गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

Most Runs In An Over: एका षटकात दिल्या ४३ धावा; या गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

Jun 26, 2024 08:52 PM IST

Ollie Robinson Unwanted Record: काऊंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.

ओली रॉबिन्सनने एका षटकात ४३ धावा दिल्या.
ओली रॉबिन्सनने एका षटकात ४३ धावा दिल्या. (AFP/X@CountyChamp)

County Championship: काऊंटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन २ मध्ये ससेक्स आणि लीसेस्टरशायर यांच्यात सामना खेळला गेला. ज्यामध्ये ससेक्सकडून खेळत असलेल्या ओली रॉबिन्सनने एकाच षटकात ४३ धावा दिल्या. लीसेस्टरशायरच्या लुईस किम्बरने त्याच्या षटकात इतक्या धावा केल्या आहेत. या षटकात रॉबिन्सनने ३ नो-बॉल आणि तिन्ही नो बॉलवर लुईस किम्बर चौघार मारले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा खर्च करणारा दुसरा गोलंदाज ठरला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा नकोशा विक्रम रॉबर्ट व्हॅन्सच्या नावावर आहे, ज्याने ७७ धावा दिल्या होत्या.

रॉबिन्सन काउंटी चॅम्पियनशिपमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला आहे आणि लुईस किम्बर हा एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या सामन्यात किम्बरने अवघ्या ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. ससेक्सविरुद्धच्या या सामन्यात त्याने आपले द्विशतकही पूर्ण केले आहे, ज्यात १९ चौकार आणि १७ गगनचुंबी षटकाराचा समावेश आहे.

रॉबिन्सनने टाकलेले षटक

पहिला चेंडू: षटकार

दुसरा चेंडू: नो बॉलवर चौकार

तिसरा चेंडू: चौकार

चौथा चेंडू: षटकार

पाचवा चेंडू: चौकार

सहावा चेंडू: नो बॉलवर चौकार

सातवा चेंडू: चौकार

आठवा चेंडू: नो बॉलवर चौकार

नववा चेंडू: एक धाव

एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाज

रॉबर्ट व्हॅन्स (वेलिंग्टन विरुद्ध कँटरबरी): ७७ धावा

ऑली रॉबिन्सन (ससेक्स विरुद्ध लीसेस्टरशायर): ४३ धावा

ॲलेक्स ट्यूडर (सरे विरुद्ध लँकेशायर): ३८ धावा

शोएब बशीर (वूस्टरशायर विरुद्ध सरे): ३८ धावा

माल्कम नॅश (ग्लॅमॉर्गन विरुद्ध नॉटिंगहॅमशायर): ३६ धावा

किम्बरने स्टोक्सचा विक्रम मोडला

किम्बर दुसऱ्या डावात १२७ चेंडूत २४३ धावांची शानदार खेळी करत लेस्टरशायरने ८०.४ षटकांत ४४५ धावा केल्या. वेगवान गोलंदाज रॉबिन्सनने २० षटकांत २ गडी बाद करत १०५ धावा केल्या. किंबरने काउंटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक झळकावले. त्याच्या १८ व्या षटकाराने स्टोक्सचा काउंटी चॅम्पियनशिपच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. विश्वविक्रम रचूनही किंबरची संस्मरणीय खेळी व्यर्थ गेली आणि लेस्टरशायरला ससेक्सकडून १८ धावांनी पराभव पत्करावा लागला.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग