IND vs BAN : बांगलादेशचे हे तीन खेळाडू टीम इंडियाला दणका देणार? एकजण १५० च्या स्पीडने गोलंदाजी करतो-3 these bangladesh players to watch out ind vs ban test series 2024 nahid rana shakib al hasan mushfiqur rahim ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN : बांगलादेशचे हे तीन खेळाडू टीम इंडियाला दणका देणार? एकजण १५० च्या स्पीडने गोलंदाजी करतो

IND vs BAN : बांगलादेशचे हे तीन खेळाडू टीम इंडियाला दणका देणार? एकजण १५० च्या स्पीडने गोलंदाजी करतो

Sep 12, 2024 05:42 PM IST

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका महत्त्वाची आहे.

IND vs BAN : बांगलादेशचे हे तीन खेळाडू टीम इंडियाला दणका देणार? एकजण १५० च्या स्पीडने गोलंदाजी करतो
IND vs BAN : बांगलादेशचे हे तीन खेळाडू टीम इंडियाला दणका देणार? एकजण १५० च्या स्पीडने गोलंदाजी करतो

भारतीय क्रिकेट संघासमोर पुढील आव्हान बांगलादेशचे आहे. उभय संघांमधली दोन कसोटी सामन्यांची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ही मालिका खूप महत्त्वाची आहे कारण ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा भाग आहे.

बांगलादेशने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून कसोटी मालिकेत पराभूत केले होते. आता भारताला पराभूत करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

दरम्यान, बांगलादेशी संघात तीन खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतात. या खेळाडूंनी पाकिस्तानलादेखील त्रस्त केले होते. अशा स्थितीत आपण या ठिकाणी त्या बांगलादेशी खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत, जे टीम इंडियासाठी अडचणी निर्माण करू शकतात.मुशफिकर रहीम

मुशफिकुर रहीम

मुशफिकुर रहीम २००५ पासून बांगलादेश संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १९१ धावांची शानदार खेळी केली होती. ती शतकी खेळी त्याचे मनोबल वाढवण्यासाठी काम करत असेल.

भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा रहीम हा बांगलादेशी खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने टीम इंडियाविरुद्धच्या ८ कसोटी सामन्यात ६०४ धावा केल्या आहेत. या आकडेवारीवरून असे दिसून येते की त्याला भारताविरुद्ध धावा करणे आवडते आणि यावेळीही तो गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतो.

नाहिद राणा

२१ वर्षीय वेगवान गोलंदाज नाहिद राणाने यावर्षी श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने खळबळ उडवून दिली. ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करत त्याने क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ उडवून दिली.

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदसोबत नाही तर बाबर आझमलाही बाद केले. वाढलेल्या वेगासह वाढलेला आत्मविश्वास त्याला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यास मदत करेल.

शाकिब अल हसन

बांगलादेश संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक शाकिब अल हसन केवळ चेंडूनेच नाही तर बॅटनेही टीम इंडियाला अडचणीत आणू शकतो. शाकिबच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ४५४३ धावा असून त्याने २४२ विकेट्सही घेतल्या आहेत.

शाकिब अल हसनने आतापर्यंत भारताविरुद्धच्या ८ कसोटी सामन्यात ३७६ धावा आणि २१ विकेट घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजी भारताविरुद्ध अधिक प्रभावी ठरली आहे आणि त्याचा फिरणारा चेंडू भारतीय खेळपट्ट्यांवर पुन्हा कहर करू शकतो.

Whats_app_banner