Rohit Sharma : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? आरसीबीसह हे तीन संघ हिटमॅनच्या मागे जाणार, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? आरसीबीसह हे तीन संघ हिटमॅनच्या मागे जाणार, पाहा

Rohit Sharma : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? आरसीबीसह हे तीन संघ हिटमॅनच्या मागे जाणार, पाहा

Updated Oct 29, 2024 03:50 PM IST

Rohit Sharma In Ipl Auction : मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माला रिटेन करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण रोहित शर्मा जर लिलावात उतरला त्याला मोठी किंमत मिळू शकते. तसेच, रोहितच्या मागे अनेक संघ जावू शकतात.

Rohit Sharma : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? आरसीबीसह हे तीन संघ हिटमॅनच्या मागे जाणार, पाहा
Rohit Sharma : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? आरसीबीसह हे तीन संघ हिटमॅनच्या मागे जाणार, पाहा (AFP)

आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले आणि हार्दिक पंड्याकडे संघाची कमान दिली. पण संपूर्ण स्पर्धेदरम्यान रोहित आणि हार्दिकमधील अंतर स्पष्टपणे दिसत होते. यासोबतच मुंबई इंडियन्स फ्रँचायझी आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

अशा स्थितीत मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माला रिटेन करणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण रोहित शर्मा जर लिलावात उतरला त्याला मोठी किंमत मिळू शकते. तसेच, रोहितच्या मागे अनेक संघ जावू शकतात.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्स कर्णधाराच्या शोधात आहे. या संघाला अद्याप आयपीएलचे विजेतेपद मिळालेले नाही. रोहित शर्माकडे कर्णधार म्हणून ५ आयपीएल जेतेपदे जिंकण्याचा अनुभव आहे. अशा परिस्थितीत रोहितला विकत घेऊन पंजाब किंग्जला आपले नशीब बदलायचे आहे. त्यामुळे पंजाब किंग्स रोहित शर्माच्या मागे जावू शकतो.

दिल्ली कॅपिटल्स

आयपीएल २०२४ पूर्वीदेखील रोहित शर्मा दिल्लीला जाणार असल्याची चर्चा होती. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सचा संघ ऋषभ पंतला सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा स्थितीत दिल्लीला अनुभवी खेळाडूची गरज भासेल. या स्थितीत फ्रँचायझी रोहित शर्माकडे जाऊ शकते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चांगल्या कर्णधाराच्या शोधात आहे. सोबतच विराट कोहली आणि रोहित शर्मा एकाच संघाकडून खेळणार असतील तर चाहत्यांना आणखी काय हवे असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या बेंगळुरू कसोटीतही चाहत्यांनी रोहितला आरसीबीमध्ये जाण्यास सांगितले होते. रोहित सध्या ३७ वर्षांचा आहे आणि तो २-३ वर्षे सहज टी-20 खेळू शकतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या