आयपीएल २२०४ मधील एका सामन्यादरम्यान लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आणि फ्रँचायझी मालक संजीव गोयंका यांच्यात वाद झाला होता. या घटनेचा व्हिडीओ त्यावेळी प्रंचड व्हायरलदेखील झाला होता.
हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर गोयंका हे भर मैदानातच राहुलला खडसावताना दिसले होते. त्या सामन्यानंतर लखनौचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नाही. तेव्हापासून, फ्रँचायझी मेगा लिलावापूर्वी राहुलला रीलीज करणार असल्याच्या बातम्या सतत येत आहेत.
दरम्यान, आतापर्यंत तरी फ्रँचायझीने केएल राहुलला रिटेन करण्याचा किंवा रीलीज करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण आपण जाणून घेणार आहोत की, लखननौता संघ खालील कारणांमुळे राहुलला रिटेन करणार नाही.
केएल राहुलसोबत स्ट्राइक रेटची खूप समस्या आहे. त्याने एकदा T20 मधील स्ट्राइक रेट हा प्रकार ओव्हररेटेड असल्याचे विधान केले होते. पॉवरप्लेमध्ये तो खूप हळू सुरुवात करतो. खेळपट्टीवर सेट होण्यासाठी वेळ घेतो. त्यामुळेच त्याला भारतीय टी-२० संघातूनही वगळण्यात आले आहे. राहुलच्या स्ट्राईक रेटमुळे लखनऊला आयपीएलमध्ये काही पराभवदेखील पत्करावे लागले आहेत. यामुळेच फ्रँचायझी त्याला कायम ठेवू शकत नाही.
केएल राहुल कर्णधार म्हणूनही स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. काही काळापूर्वी तो भारताचा पुढचा कर्णधार असल्याचे बोलले जात होते. पण आता तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये उपकर्णधार नाही. आयपीएलमध्येही राहुलच्या नेतृत्वाखाली त्याचा संघ कधीच फायनलपर्यंत पोहोचू शकला नाही. लखनौने दोन मोसमात प्लेऑफ गाठले पण असे म्हणतात की गौतम गंभीर हाच बहुतेक निर्णय घेत असे. गंभीरने लखनौला सोडताच संघ अपयशी ठरला.
IPL २०२३ मध्ये तो संपूर्ण सीझन खेळू शकला नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही तो दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. आयपीएलच्या मध्यात तो दुखापतग्रस्त झाला तर संघासमोर अडचण निर्माण होईल. ोराहुल ३२ वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझीने तरुण खेळाडूला कायम ठेवल्यास भविष्यातही त्याचा उपयोग होईल.