Match Fixing : क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचं मोठं प्रकरण बाहेर, लोनावो त्सोसोबेसह 'या' तीन खेळाडूंना अटक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Match Fixing : क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचं मोठं प्रकरण बाहेर, लोनावो त्सोसोबेसह 'या' तीन खेळाडूंना अटक

Match Fixing : क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचं मोठं प्रकरण बाहेर, लोनावो त्सोसोबेसह 'या' तीन खेळाडूंना अटक

Nov 30, 2024 11:21 AM IST

Match Fixing South African Cricketers Arrested : २०२४ हे वर्ष संपण्यापूर्वी एक मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडूंना अटक करण्यात आली आहे.

Match Fixing : क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचं मोठं प्रकरण बाहेर, लोनावो त्सोसोबेसह 'या' तीन खेळाडूंना अटक
Match Fixing : क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचं मोठं प्रकरण बाहेर, लोनावो त्सोसोबेसह 'या' तीन खेळाडूंना अटक

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून एकम मोठी बातमी समोर आली आहे. येथून ८ वर्ष जुने मॅच फिक्सिंगचे प्रकरण उघडकीस आले आहे, ज्यासाठी तीन खेळाडूंना अटक करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी थामी सोलेकिल, लोनावो त्सोटोबे आणि अथी म्बलाती यांना अटक करण्यात आली आहे. या तिन्ही क्रिकेटपटूंना १८, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

ही अटक डीपीसीआयच्या गंभीर भ्रष्टाचार अन्वेषण युनिटने केली आहे. २०१६ मध्ये एका व्हिसलब्लोअरने केलेल्या खुलाशांवर आधारित हा तपास होता. गुलाम बोदीच्या संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्याने तपास सुरू केला होता.

थामी सोलेकिल आणि लोनावो त्सोसोबे यांंच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा, २००४ (PRECCA) अंतर्गत ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही खेळाडू २९ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रिटोरिया येथील विशेष व्यावसायिक गुन्हे न्यायालयात हजर झाले, जिथे या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.

गुलाम बोदी याचेही नाव समोर आले

गुलाम बोदीने अनेक खेळाडूंशी संपर्क साधून तीन देशांतर्गत टी-20 सामन्यांच्या निकालांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. तो भारतीय बुकींसह या कटाचा भाग होता.

बोदीला २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती आणि २०१९ मध्ये त्याला आठ गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते, त्यानंतर त्याला ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

या तिन्ही क्रिकेटपटूंची क्रिकेट कारकीर्द

अटक करण्यात आलेल्या तीन खेळाडूंपैकी फक्त लोनावो त्सोसोबे हा दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचा भाग होता. त्याने ५ कसोटी, ६१ एकदिवसीय आणि २३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१४ च्या टी-20 विश्वचषकातील होता. तर थामी सोलेकिल आणि अथी म्बलाती यांची कारकीर्द प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटपुरती मर्यादित होती.

Whats_app_banner