१६ वर्षांच्या फरहान अहमदने रचला इतिहास, रॉरी बर्न्स-विल जॅकसारख्या ५ कसोटीपटूंची केली शिकार-16 years old bowler farhan ahmed makes history he become youngest bowler to pick 5 wickets in county cricket ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  १६ वर्षांच्या फरहान अहमदने रचला इतिहास, रॉरी बर्न्स-विल जॅकसारख्या ५ कसोटीपटूंची केली शिकार

१६ वर्षांच्या फरहान अहमदने रचला इतिहास, रॉरी बर्न्स-विल जॅकसारख्या ५ कसोटीपटूंची केली शिकार

Aug 31, 2024 02:57 PM IST

सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप खेळली जात आहे. याच स्पर्धेत इंग्लंडचा लेगस्पिनर रेहान अहमदचा धाकटा भाऊ फरहान अहमदने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ५ विकेट घेत एक मोठा विक्रम केला.

१६ वर्षांच्या फरहान अहमदने रचला इतिहास, रॉरी बर्न्स-विल जॅकसारख्या ५ कसोटीपटूंची केली शिकार
१६ वर्षांच्या फरहान अहमदने रचला इतिहास, रॉरी बर्न्स-विल जॅकसारख्या ५ कसोटीपटूंची केली शिकार

इंग्लिश क्रिकेटमध्ये एक नवा स्टार उदयास येत आहे. १६ वर्षीय फरहान अहमद याने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फरहान याने नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना आपल्या फिरकीने इतिहास रचला आहे.

फरहानने सरेविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह फरहान ५ विकेट घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे.

फरहान अहमद ५ विकेट घेणारा सर्वात युवा गोलंदाज

इंग्लंडचा लेगस्पिनर रेहान अहमदचा धाकटा भाऊ फरहान अहमद याने वयाच्या १६ वर्षे १८९ दिवसांत ही कामगिरी केली. याआधी हा विक्रम डर्बीशायरच्या हमीदुल्लाह काद्रीच्या नावावर होता, ज्याने २०१७ मध्ये १६ वर्षे २०३ दिवस वय असताना ५ विकेट घेतल्या होत्या.

फरहानची कामगिरीही खास आहे कारण त्याने रॉरी बर्न्स, बेन फॉक्स आणि विल जॅकसारख्या कसोटीपटूंना बाद केले आहे.

फरहान अहमदने ५०.४ षटके गोलंदाजी करताना १४० धावांत ७ विकेट घेतल्या. या आकड्यांवरून कसोटी क्रिकेटला लागणारा संयम आणि विकेट घेण्याची क्षमता दिसून येते. त्याने फक्त २.७६ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली, जी त्याचे वय आणि अनुभव लक्षात घेता खूप प्रभावी आहे. सरेने या सामन्यात ५०० हून अधिक धावा केल्या.

फरहान अहमद इंग्लंडच्या अंडर-१९ संघाकडून खेळला

फरहान अहमदच्या कामगिरीमुळे त्याला नॉटिंगहॅमशायरचा सर्वात तरुण काउंटी चॅम्पियनशिप खेळाडू म्हणून ओळख मिळाली आहे. त्याने याआधी इंग्लंडच्या अंडर-१९ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि आता त्याचे लक्ष इंग्लंडच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी आहे.

काउंटी चॅम्पियनशिपमध्ये साई सुदर्शनचीही चमकदार कामगिरी

या सामन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शनची चमकदार कामगिरी. त्याने सरेसाठी १०५ धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत नेले. त्याच्या डावात १० चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. त्याने जॉर्डन क्लार्कसोबत १०१ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे सरेला ५०० हून अधिक धावा करता आल्या.