मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अफगाणिस्तानच्या १६ वर्षीय फिरकीपटूची IPL मध्ये एन्ट्री, केकेआरकडून खेळणार

अफगाणिस्तानच्या १६ वर्षीय फिरकीपटूची IPL मध्ये एन्ट्री, केकेआरकडून खेळणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 28, 2024 10:58 PM IST

allah ghazanfar joins kkr, IPL 2024 : अफगाणिस्तानचा १६ वर्षीय खेळाडू आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणार आहे. अल्लाह गझनफर असे या फिरकी गोलंदाजाचे नाव आहे.

allah ghazanfar joins kkr, IPL 2024
allah ghazanfar joins kkr, IPL 2024

आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत ८ सामने खेळले गेले आहेत. पण या दरम्यान खेळाडूंच्या बदलीची बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्स आणि केकेआरने त्यांचा प्रत्येकी एक खेळाडू बदलला आहे.

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब-उर-रहमान दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. त्याच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सने अफगाणिस्तानचा १६ वर्षीय ऑफस्पिन गोलंदाज अल्लाह गझनफरला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. गझनफरने आतापर्यंत २ एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. 

मुजीब-उर रहमान IPL मधून बाहेर

गझनफर याआधी १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक २०२४ मध्ये दिसला होता. आतापर्यंत त्याने आपल्या कारकिर्दीत ३ टी-20 सामने आणि ६ लिस्ट-ए सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे ५ आणि ४ विकेट घेतल्या आहेत. केकेआरने गझनफरला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले आहे.

मुजीब-उर-रहमान आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जकडून खेळला आहे. परंतु २०२४ च्या लिलावात केकेआरने त्याला २ कोटी रुपयांना विकत घेतले. मुजीब २०२१ नंतर आयपीएलमध्ये खेळलेला नाही, परंतु दुखापतीमुळे त्याला यावेळीही बाहेर बसावे लागले. 

केशव महाराज राजस्थानकडून खेळणार

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघातही मोठा बदल पाहायला मिळाला आहे. प्रसिध कृष्ण सलग दुसऱ्या सीझनमधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी राजस्थानने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू केशव महाराजला आपल्या संघात स्थानला आहे. 

पायाला झालेल्या दुखापतीमुळे महाराजवरही शस्त्रक्रिया करावी लागली आहेत आणि सध्या तो त्यातून सावरत आहेत. आयपीएल २०२४ साठी तो लखनऊ सुपर जायंट्ससोबत होता, पण आता तो आरआरकडून खेळताना दिसणार आहे.

केशव महाराजचे क्रिकेट करिअर

केशव महाराज याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत २७ टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६७१ धावा केल्या आहेत. तसेच, २४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर ४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,६८६ धावा आहेत. सोबतच ५५ विकेट आहेत. जर आपण त्याच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत ५० सामने खेळले आहेत आणि ११३५ धावा केल्या आहेत आणि १५८ बळीही घेतले आहेत.

IPL_Entry_Point