Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअरची घसरगुंडी सुरूच! आणखी सोसावं लागण्याचा एक्सपर्ट्सचा अंदाज
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअरची घसरगुंडी सुरूच! आणखी सोसावं लागण्याचा एक्सपर्ट्सचा अंदाज

Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअरची घसरगुंडी सुरूच! आणखी सोसावं लागण्याचा एक्सपर्ट्सचा अंदाज

Jan 21, 2025 01:09 PM IST

Zomato Share Price : निराशाजनक तिमाही निकालानंतर झोमॅटोच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली.

Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअरची घसरगुंडी सुरूच! आणखी सोसावं लागण्याचा एक्सपर्ट्सचा अंदाज
Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअरची घसरगुंडी सुरूच! आणखी सोसावं लागण्याचा एक्सपर्ट्सचा अंदाज

Share Market News : तिसऱ्या तिमाहीत तोटा झाल्यामुळं सुरू झालेली झोमॅटोच्या शेअरची घसरण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आज बाजार उघडताच झोमॅटोचा शेअर एनएसईवर ९ टक्क्यांपेक्षा अधिक घसरून २१२.३० रुपयांवर आला. ब्रोकरेज हाऊसेसनंही झोमॅटोच्या शेअर्सची टार्गेट प्राइस कमी केली आहे.

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस मॅक्वायरीनं झोमॅटोवर अंडरपरफॉर्म रेटिंग कायम ठेवलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्ससाठी १३० रुपयांचं टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे. मॅक्वेरीच्या मतानुसार, ब्लिंकिटचं मार्जिन दीर्घकाळ नकारात्मक राहू शकतं. 

विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजनं झोमॅटोच्या शेअर्सला होल्ड रेटिंग दिलं आहे. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस २७५ रुपयांवरून २५५ रुपयांपर्यंत कमी केली आहे. तर नोमुरानं झोमॅटोच्या शेअर्सवर बाय रेटिंग कायम ठेवत कंपनीच्या शेअर्ससाठी २९० रुपयांचे टार्गेट दिलं आहे. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीननं झोमॅटोच्या शेअर्ससाठी ३१० रुपयांची टार्गेट प्राइस दिली आहे. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या समभागांना आउटपरफॉर्म रेटिंग दिलं आहे.

किती झाला तोटा?

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा एकत्रित निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत ५७ टक्क्यांनी घसरून ५९ कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झोमॅटोचा एकत्रित निव्वळ नफा १३८ कोटी रुपये होता. डिसेंबर २०२४ तिमाहीत झोमॅटोचा महसूल ६४ टक्क्यांनी वाढून ५४०५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झोमॅटोचं उत्पन्न ३,२८८ कोटी रुपये होतं. तिमाही आधारावर कर भरल्यानंतर झोमॅटोच्या नफ्यात ६६ टक्क्यांनी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत झोमॅटोचा नफा १७६ कोटी रुपये होता.

काय आहे शेअरची स्थिती?

सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर ९ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला होता. त्यानंतर तो काहीसा सावरला. दुपारी १ वाजून २० मिनिटांनी हा शेअर ८.९५ टक्क्यांनी घसरून २१८.३० रुपयांवर ट्रेड करत होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner