मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to watch : गेल्या ६ महिन्यांत जवळपास ८० टक्क्यांनी वाढला शेअर; आता काय करायचं? एक्सपर्ट्स म्हणतात…

Stocks to watch : गेल्या ६ महिन्यांत जवळपास ८० टक्क्यांनी वाढला शेअर; आता काय करायचं? एक्सपर्ट्स म्हणतात…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 11, 2024 02:16 PM IST

Zomato Share Price News : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअरमध्ये कमालीची वाढ झाली असून एक्सपर्ट्सनी शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे.

Zomato Share Price
Zomato Share Price

Zomato Share Price News : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा शेअर सातत्यानं वाढत असून आज या शेअरनं नवा उच्चांक गाठला आहे. आज हा शेअर एनएसईवर २ टक्क्यांहून अधिक वाढून १३७.४० रुपयांवर पोहोचला आहे. मार्केट एक्सपर्ट्स या शेअरबाबत प्रचंड आशावादी असून त्यांनी खरेदी सल्ला दिला आहे.

मागच्या अवघ्या सहा महिन्यांत झोमॅटोचा शेअर जवळपास ८० टक्क्यांनी वाढला आहे. सध्याच्या तेजीमुळं शेअरनं आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ४४.३५ रुपये आहे. 

Stock Market Investment : शेअर बाजारात गुंतवणूक करताना टाळा 'या' बेसिक चुका

विदेशी ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीनं झोमॅटोचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्सला बाय रेटिंग दिलं असून हा शेअर १५० रुपयांपर्यंत जाईल असं एचएसबीसीनं म्हटलं आहेय. 

एलारा सिक्युरिटीजनंही झोमॅटोच्या शेअर्ससाठी १५० रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित करत शेअरला ‘बाय रेटिंग’ दिलं आहे. वाढीव सुविधा शुल्क, जाहिरातींतून येणारं उत्पन्न आणि रेस्टॉरंट्सचं कमिशन यामुळं कंपनीच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाच्या नफ्यात सुधारणा होईल, असं एलारा सिक्युरिटीजनं म्हटलं आहे.

Short Selling : शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? ते का आणि कसं केलं जातं? काय आहेत त्याचे नियम?

एका वर्षात १५३ टक्क्यांनी वाढ

गेल्या एका वर्षात झोमॅटोच्या शेअर्समध्ये १५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ११ जानेवारी २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स ५४.३५ रुपयांवर होते. आज, ११ जानेवारी २०२४ रोजी हा शेअर १३७.४० रुपयांवर ट्रेड करत आहे. मागच्या सहा महिन्यांत कंपनीचे शेअर्स ७६.७७ रुपयांवरून १३७.४० रुपयांपर्यंत वाढले आहेत. मागच्या एका महिन्यात शेअरमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. झोमॅटोचा आयपीओ ७६ रुपये दरानं वितरित झाला होता. तर, कंपनीचे शेअर बाजारात ११५ रुपयांवर लिस्ट झाला होता.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनी व शेअरची केवळ माहिती आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांच्या मताशी हिंदुस्तान टाइम्स मराठी सहमत असेलच असं नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग