ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या सहसंस्थापक आकृती चोप्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ती १३ वर्षांपासून झोमॅटोमध्ये काम करत होती. झोमॅटोने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत या राजीनाम्याची माहिती दिली आहे. "सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 30 नुसार, आम्ही सूचित करू इच्छितो की आकृती चोप्राने 27 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला आहे.