Nikhil Kamath news : घर विकत घेण्याच्या कल्पनेला नाक मुरडणारे व भाड्याच्या घरात राहण्याची वकिली करणारे 'झिरोधा'चे सहसंस्थापक निखिल कामत यांनी अखेर विचार बदलला आहे. त्यांनी स्वत:चं घर खरेदी केलं आहे. त्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
'डब्ल्यूटीएफ इज विथ निखिल कामत' या पॉडकास्टच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात कामत यांनी प्रेस्टीज ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी इरफान रझाक, ब्रिगेड ग्रुपच्या कार्यकारी संचालक निरुपा शंकर आणि वीवर्क इंडियाचे सीईओ करण विरवानी यांच्याशी घर खरेदी विरुद्ध भाड्यानं या वादावर भाष्य केलं. भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक असलेल्या निखिल कामत यांची संपत्ती ३.१ अब्ज डॉलर आहे.
आजपर्यंत घर भाड्यानं घेण्याच्या बाजूनं युक्तिवाद करणाऱ्या ३७ वर्षीय कामत यांनी यावेळी घर भाड्यानं घेण्याचा एक तोटा सांगितला. ‘घर भाड्यानं घेण्याचे अनेक फायदे आहेत, पण एक तोटाही आहे. या घरातून कधी बाहेर पडावं लागेल हे आपल्या हातात नसतं. मला ज्या घरातून अचानक बाहेर पडावं लागतं, तिथं कदाचित मला आणखी काही दिवस राहायला आवडलं असतं,’ असं कामत म्हणाले.
घर विकत घेतल्यानं आपली आर्थिक बाजू भक्कम होते असं तुम्हाला वाटतं का, या प्रश्नावर कामत यांनी संदिग्ध उत्तर दिलं. रिअल इस्टेटला कॅश करणं खूप कठीण असतं या गोष्टीचा मला खूप राग आहे, असं ते म्हणाले. सोन्यातील गुंतवणूक मला ती मोकळीक देऊ शकतं. रिअल इस्टेटमध्ये खरेदीदार कमी असतात आणि १० लोकांनी एकाच वेळी विक्री करण्याचा निर्णय घेतला तर परिस्थिती आणखी कठीण होऊन जाते. किंमती देखील अनेकदा मनमानी स्वरूपाच्या असतात. त्याऐवजी शेअर बाजारात जास्त लोक असणं गरजेचं आहे. एखाद्या कंपनीचे शेअर दहा लाख लोकांनी विकण्याचा निर्णय घेतला, तर खूप मोठा फरक पडतो, असं कामत म्हणाले.
मालमत्तेच्या किमतीवर सरकार आकारत असलेलं मुद्रांक शुल्क भरण्याबाबतही कामत यांनी नाराजी व्यक्त केली. शेअर बाजारात मी ५ ते ६ टक्के मुद्रांक शुल्क न भरता खरेदी-विक्री करू शकतो, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
घर विकत घेणं आणि ते भाड्यानं देणं यातून खरंच काही फायदा होतो का, यावरही या उद्योजकांनी चर्चा केली. निखिल कामत यांनी यावरही नकारात्मक मत व्यक्त केलं. 'घर विकत घेऊन आणि ते भाड्यानं देऊन कोणी पैसे कमावत असेल असं वाटत नाही. एअरबीएनबीसारख्या कंपनीलाही त्यांच्या जागेत वर्षभर राहणारं कुणी गिऱ्हाईक मिळत नाही. महागाई आणि व्याजदराचा विचार केल्यास या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा नगण्य आहे.