Hurun India Rich List 2024: घरपोच काही वेळात हव्या त्या वस्तु वितरीत करणाऱ्या झेप्टोचे सह-संस्थापक कैवल्य वोहरा व आदित पालिचा या दोघांनी हुरून इंडिया रिच लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. या दोघांकडे अनुक्रमे ३,६०० कोटी व ४,३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. कैवल्य वोहरा फक्त २१ वर्षांचा आहे. तो भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सर्वात तरुण आहे. बेंगळुरूमध्ये जन्मलेला कैवल्य वोहराने पहिल्यांदा २०२२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये स्थान मिळवले होते.
हुरुन इंडिया रिच लिस्ट ही गेल्या १३ वर्षांपासून प्रसिद्ध केली जात आहे. या यादीमध्ये आतापर्यंत १५३९ श्रीमंत व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची एकूण संपत्ती ही १००० कोटींपेक्षा जास्त आहे. यंदाच्या यादीत २७२ नव्या श्रीमंत चेहऱ्यांचा समावेश करण्यात आहे.
कैवल्य वोहरा याने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. मात्र त्याने हे शिक्षण अर्धवट सोडले आहे. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी प्रतिष्ठित कॉम्प्युटर सायन्स प्रोग्राममधील त्याचे शिक्षण अर्थवट सोडले. त्याने त्याचा मित्र आदित पालिचासोबत झेप्टो कंपनीची सुरूवात केली. या दोघांनी किरनाकार्ट या नावाने झेप्टो कंपणीची सुरुवात केली. किराणाकार्ट हे ऑनलाइन किराणा वस्तुंचे वितरण करणारी कंपनी आहे. ही कंपनी ४५ मिनिटांत किराणा सामान घरपोच करते. काही दिवसांनि त्यांनी किरणकार्टचा विस्तार झेप्टोमध्ये केला. Zepto कंपनी आता बेंगळुरू, लखनौ, दिल्ली आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये सेवा देत आहे. कंपनीने ऑगस्ट २०२३ मध्ये १.४ अब्ज डॉलर्समध्ये युनिकॉर्नचा दर्जा मिळवला. फोर्ब्सच्या प्रभावशाली ३० अंडर ३० एशियाच्या यादीत कैवल्य वोहराचाही समावेश करण्यात आला आहे.
गौतम अदानी हे २०२४ च्या हुरुन इंडियाच्या श्रीमंत यादीत ११.६ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ति म्हणून आघाडीवर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत ९५ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अंबानींची एकूण संपत्ती २५ टक्क्यांनी वाढून १०.१४ लाख कोटींवर पोहोचली आहे.