share market : ५६ रुपयांचा शेअर गेला १९०० पार, गुंतवणूकदारांनी लावलेल्या एक लाखाचे किती झाले पाहा!-zen tech share price stock of rs 56 crossed rs 1900 and 1 lakh rupees became almost rs 35 lakhs ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  share market : ५६ रुपयांचा शेअर गेला १९०० पार, गुंतवणूकदारांनी लावलेल्या एक लाखाचे किती झाले पाहा!

share market : ५६ रुपयांचा शेअर गेला १९०० पार, गुंतवणूकदारांनी लावलेल्या एक लाखाचे किती झाले पाहा!

Aug 27, 2024 12:21 PM IST

Zen Technologies Limited : संरक्षण क्षेत्रातील ड्रोन व अन्य साधनांची निर्मिती करणाऱ्या झेन टेक्नॉलॉजीच्या शेअरनं अवघ्या ५ वर्षांत मोठी झेप घेतली आहे.

झेन टेकचा ५६ रुपयांचा शेअर गेला १९०० पार, गुंतवणूकदारांनी लावलेल्या एक लाखाचे किती झाले पाहा!
झेन टेकचा ५६ रुपयांचा शेअर गेला १९०० पार, गुंतवणूकदारांनी लावलेल्या एक लाखाचे किती झाले पाहा!

Zen Technologies Limited share price : पाच वर्षांपूर्वी केवळ ५६ रुपयांत मिळणारा शेअर आज १९५४.३० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. या कालावधीत या कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना ३३८० टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे. थेट रकमेचा हिशेब केल्यास झेन टेकच्या शेअरमध्ये ५ वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्याचे पैसे आज जवळपास ३५ लाख झाले आहेत.

अँटी ड्रोन निर्माता झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा शेअर आज १९००.९० रुपयांवर उघडला आणि १९५४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. जूनपासून या शेअरमध्ये ११५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

झेन टेक्नॉलॉजीजनं स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं १.६०१ रुपये प्रति शेअर या दरानं क्युआयबीला (Qualified Institutional Buyer) ६.२५ दशलक्ष इक्विटी शेअर्सचं वाटप केलं आहे. झेन टेक्नॉलॉजीजनं २१ ऑगस्ट २०२४ रोजी क्यूआयपी (Qualified institutional placement) लाँच केला होता आणि २३ ऑगस्ट २०२४ रोजी बंद झाला होता. या क्यूआयपीसाठी देशी-विदेशी गुंतवणूकदारांमध्ये चुरस होती. त्यामुळं हा इश्यू जवळपास ५ पटीनं ओव्हरसब्सक्राइब झाला होता. कोटक म्युच्युअल फंड, व्हाईट ओक ऑफशोर फंड, व्हाईट ओक म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड आणि बंधन म्युच्युअल फंड या प्रमुख गुंतवणूकदारांनी या क्यूआयपीमध्ये भाग घेतला.

काय करते ही कंपनी?

झेन टेक्नॉलॉजीजची उत्पादनं भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' योजनेच्या अंतर्गत स्वदेशी पद्धतीनं विकसित करण्यात आली आहेत. संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाला चालना देणं हा त्याचा उद्देश आहे. कंपनीच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये टँक, ड्रायव्हिंग, गनरी आणि फ्लाइट सिम्युलेटर अशा अनेक सिम्युलेटरचा समावेश आहे. यासोबतच शत्रूच्या ड्रोनचा शोध घेण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी आणि निष्प्रभ करण्यासाठी डिझाइन केलेल्या अँटी-ड्रोन सिस्टीम आहेत.

एक्सपर्ट्स म्हणतात, लंबी रेस का घोडा!

शेअर बाजारातील तज्ज्ञ सीए मनीष गर्ग यांनी झेन टेकला 'लंबी रेस का घोडा' असं म्हटलं आहे. 'भारतात आता संरक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केलं जात आहे. रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास आणि इस्रायल-लेबनॉन युद्धात ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. झेन टेक अँटी ड्रोन तंत्रज्ञानावर काम करत आहे. त्यामुळं येत्या काळात त्याची मागणी वाढणार आहे. झेन टेकला भारतीय संरक्षण तसेच इतर देशांकडून ऑर्डर मिळत आहेत. या ऑर्डरमुळं शेअरही सुसाट पळेल, असा विश्वास गर्ग यांनी व्यक्त केला आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

विभाग