हे थोडं वेगळंच झालं! कंपनीच्या एमडीच्या राजीनाम्यानंतर शेअर उसळले! कोणती आहे ही कंपनी?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  हे थोडं वेगळंच झालं! कंपनीच्या एमडीच्या राजीनाम्यानंतर शेअर उसळले! कोणती आहे ही कंपनी?

हे थोडं वेगळंच झालं! कंपनीच्या एमडीच्या राजीनाम्यानंतर शेअर उसळले! कोणती आहे ही कंपनी?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 19, 2024 11:32 AM IST

Zeel share price : पुनीत गोएंका यांनी व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर झी एंटरटेनमेंटच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली.

हे थोडं वेगळंच झालं! कंपनीच्या एमडीच्या राजीनाम्यानंतर शेअर उसळले! कोणती आहे ही कंपनी?
हे थोडं वेगळंच झालं! कंपनीच्या एमडीच्या राजीनाम्यानंतर शेअर उसळले! कोणती आहे ही कंपनी?

Punit Goenka Resignation marathi news : कंपनीच्या व्यवस्थापनातील प्रमुख व्यक्तींनी राजीनामा दिल्यानंतर सर्वसाधारणपणे शेअरवर नकारात्मक परिणाम होतो. मात्र, झी एंटरटेनमेंटच्या बाबतीत उलट घडलं आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत गोएंका यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.

बीएसईवर मंगळवारी सकाळच्या व्यवहारात झी एंटरटेनमेंटच्या शेअरमध्ये जवळपास ८ टक्क्यांची वाढ झाली. झी एंटरटेनमेंटचा शेअर ११५.५० रुपयांच्या तुलनेत ११८.०५ रुपयांवर उघडला आणि ७.८ टक्क्यांनी वाढून १२४.५० रुपयांवर पोहोचला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा शेअर ७.२७ टक्क्यांनी वधारून १२३.९० रुपयांवर व्यवहार करत होता.

का दिला गोएंका यांनी राजीनामा?

पुनीत गोएंका यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून ते केवळ आपल्या ऑपरेशनल जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करू शकतील. कंपनीच्या संचालक मंडळानं पुनीत गोएंका यांचा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा स्वीकारून त्यांची सीईओ पदी नियुक्ती केली आहे. याशिवाय सीएफओ मुकुंद गलगली हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील, असं कंपनीनं म्हटलं आहे. 

शेअरहोल्डर्सच्या बैठकीच्या केवळ १० दिवस आधी गोएंका यांनी एमडी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत कंपनीचे एमडी आणि सीईओ म्हणून त्यांच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मंजुरी मिळणार होती. कंपनीची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

काय म्हणाले गोएंका?

आपल्या राजीनाम्याबाबत गोएंका म्हणाले की, 'आम्ही निश्चित केलेलं लक्ष्य साध्य करण्यासाठी पुरेसा वेळ आणि उर्जा आवश्यक आहे. केवळ ऑपरेशनल कार्यक्षमतेत ते साध्य केलं जाऊ शकतं. कंपनी आणि त्याच्या सर्व भागधारकांच्या दीर्घकालीन हितासाठी, मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. माझ्या भूमिकेची संचालक मंडळानं दखल घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner