ZEE MD & CEO Punit Goenka takes voluntary 20 percent pay cut: झी एंटरटेनमेंटचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक पुनीत गोयंका यांनी त्यांच्या पगारात स्वेच्छेने २० टक्के पगार कपात केली आहे. कॉस्ट कटिंग अंतर्गत त्यांनी त्यांच्या पगारात कपात केली. ही रक्कम ७ कोटींहून अधिक आहे. गेल्या वर्षी ३१ मार्चपर्यंत गोयंका यांचा वार्षिक पगार ३५.०७ कोटी रुपये होता.
मनुष्यबळ कपातीनंतर आता झी एंटरटेनमेंटमधील कर्मचाऱ्यांच्या पगार देखील आता कमी होऊ लागले आहेत. दरम्यान, कंपणीचे मालक आणि सीईओ पुनित गोयंका यांनी देखील त्यांच्या पगारात स्वेच्छेने २० टक्के पगार कपात केली आहे. या बाबत झी एंटरटेनमेंटने मंगळवारी सांगितले की कंपनीचे सीईओ पुनित गोएंका हे त्यांच्या पगारात २० टक्के कपात करणार आहेत. गेल्या वर्षी ३१ मार्चपर्यंत, गोएंका यांचा वार्षिक पगार ३५.०७ कोटी रुपये होता. आता त्यांच्या पगारात ७ कोटी रुपयांनी पगार कपात होणार आहे.
कंपनीच्या कॉस्ट कटिंग मोहिमेचा एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन सेंटरमध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. तर मनुष्यबळ कपात देखील करण्यात आली होती. झी त्याच्या इंग्रजी टीव्ही चॅनेलसह त्याच्या काही व्यवसायांमधील तोटा कमी करण्यासाठी आणि नफ्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी टाळेबंदी आणि पगार कपातीद्वारे खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
झीने शुक्रवारी पॅनेलच्या शिफारशींच्या आधारे बेंगळुरूमधील तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास निम्मी केली होती.
या वर्षाच्या सुरुवातीला सोनी इंडियामध्ये कंपनीचे १० अब्ज डॉलरचे विलीनीकरण अयशस्वी होण्यामागे गोएंका हे प्रमुख कारण होते. विलीन झालेल्या संस्थेचे नेतृत्व कोण करणार यावरून मुख्यत: वाद निर्माण झाला होता.
झी ने गोयंका यांना कंपनीची धुरा सांभाळण्याची ऑफर दिली होती, परंतु बाजार नियामक सेबीच्या चौकशीचा विषय पुढे आल्याने सोनीने या कारारतून माघार घेतली. सोनी इंडियासोबतचा करार अयशस्वी झाल्यानंतर झीचे शेअर्स जवळपास ३४ टक्क्यांनी घसरले होते.
पगार कपातीच्या निर्णयाबाबत गोयंका म्हणाले, कंपनीने काटकसरीचे धोरण लागू केले आहे. या साठी मी कंपनीच्या सर्व विभागांमध्ये आवश्यक पावले उचलली आहे. याची सुरुवात मी माझ्या पासून केली आहे. या साठी माझ्या पगारात २० टक्क्यांची कपात मी करून घेतली आहे. गोयंका यांचा निर्णय झी बोर्डाच्या नामनिर्देशन आणि मानधन समितीकडे सादर करण्यात आला. झी चे अध्यक्ष आर गोपालन यांनी त्यांच्या निर्णयाचे आणि त्यांच्या हेतूचे कौतुक केले.