YouTube Lanched New Features: युट्यूब व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. युजर्सचा पाहण्याचा अनुभव अधिक जबरदस्त करण्यासाठी कंपनीने अनेक नवे फीचर्स लॉन्च केले आहेत. यामध्ये एआय पॉवर्ड जंप अगेंड आणि शॉर्ट्ससाठी पिक्चर-इन-पिक्चर मोडसह अनेक फीचर्सचा समावेश आहेत. युट्यूबमधील जंप अहेड फीचर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करते. या फीचरच्या मदतीने युजर्स कोणत्याही व्हिडिओच्या सर्वात खास भागापर्यंत फक्त एका टॅपवर पोहोचतील. यासाठी युट्यूबचा एआय व्हिडिओच्या त्या भागातून डेटा गोळा करेल, जो युजर्सने सर्वाधिक वेळा पाहिला आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या अँड्रॉइड युजर्ससाठी युट्यूबने हे नवे फीचर रोलआउट केले आहे. आयफोन युजर्ससाठीही हे फीचर लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे.युट्यूबमधील दुसरा मोठा बदल शॉर्ट्ससाठी आहे. आता कंपनी शॉर्ट्ससाठी पिक्चर-इन-पिक्चर मोड देत आहे. याच्या मदतीने युजर्स इतर अॅप्सचा वापर करून छोट्या फ्लोटिंग विंडोमध्ये शॉर्ट्स पाहू शकतात. या फिचर्सव्यतिरिक्त युट्यूब आणखी अनेक प्रायोगिक फीचर्सची टेस्टिंग करत आहे.
यामध्ये शॉर्ट्ससाठी स्मार्ट डाउनलोडआणि संभाषणात्मक एआय सहाय्यकासह संगणकाच्या व्हिडिओ वॉच पृष्ठाचे नवीन डिझाइन समाविष्ट आहे. स्मार्ट डाऊनलोड फीचरच्या मदतीने युजर्स नंतर ऑफलाइन पाहण्यासाठी आपोआप शॉर्ट्स सेव्ह करू शकतात. त्याचबरोबर एआय असिस्टंट युजरच्या आवडीनुसार संबंधित कंटेंट दाखवेल.
याशिवाय, संगणकावर युट्यूब पाहणाऱ्या युजर्ससाठी कंपनी व्हिडिओ वॉच पेजचे नवे डिझाइन आणणार आहे. यामुळे युजर्ससंबंधित व्हिडिओ सर्च करू शकतील आणि सहज कमेंट करू शकतील. युट्यूबच्या प्रीमियम सबस्क्रायबर्ससाठी हे फीचर जबरदस्त आहे. अमेरिकेत युट्यूबच्या प्रीमियम सब्सक्रिप्शनसाठी युजर्सला दरमहिन्याला ११.९९ डॉलर (जवळपास १ हजार रुपये) खर्च करावे लागतात. भारतासह इतर देशांमध्ये ही नवीन फीचर्स लवकरच रोलआउट केली जातील, अशी अपेक्षा आहे.
यूट्युब हे गूगलच्या मालकीचे अमेरिकन ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. युट्यूब १४ फेब्रुवारी २००५ स्टीव्ह चेन, चाड हर्ली आणि जावेद करीम, पेपलचे तीन माजी कर्मचारी यांनी सुरू केले. गूगलनंतर ही जगातील दुसरी सर्वाधिक भेट दिली जाणारी वेबसाइट आहे. युट्यूबचे २.५ अब्जाहून अधिक मासिक वापरकर्ते आहेत.