Personal Loan : पगार कमी असला तरी तुम्हाला मिळू शकतं पर्सनल लोन! फक्त या ५ गोष्टी ध्यानात ठेवा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Personal Loan : पगार कमी असला तरी तुम्हाला मिळू शकतं पर्सनल लोन! फक्त या ५ गोष्टी ध्यानात ठेवा!

Personal Loan : पगार कमी असला तरी तुम्हाला मिळू शकतं पर्सनल लोन! फक्त या ५ गोष्टी ध्यानात ठेवा!

Jan 03, 2025 04:04 PM IST

Personal Loan Tips : पर्सनल लोन घेण्यासाठी कमी पगार असलेल्यांनी काळजी करण्याची गरज नाही. पात्रतेच्या निकषांची व्यवस्थित पूर्तता केल्यास कर्ज मिळणं सहज शक्य आहे. कसं ते पाहा!

Personal Loan : पगार कमी असला तरी तुम्हाला मिळू शकतं पर्सनल लोन! फक्त या ५ गोष्टी ध्यानात ठेवा!
Personal Loan : पगार कमी असला तरी तुम्हाला मिळू शकतं पर्सनल लोन! फक्त या ५ गोष्टी ध्यानात ठेवा!

How To Get Personal Loan : तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचं आहे, पण तुमचा पगार कमी आहे म्हणून मिळणार नाही असं वाटत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही पर्सनल लोनसाठी नक्कीच पात्र ठरू शकता. कमी पगार असलेल्या गरजू व्यक्तींना बहुतांश बँका काही अटींसह पर्सनल लोन देतात.

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. त्यात एखाद्या समारंभाचं आयोजन किंवा घराचं नूतनीकरण, प्रिय व्यक्तीसाठी महागडी वस्तू खरेदी करणं किंवा सुट्टी एन्जॉय करणं, अशा बऱ्याच कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेतलं जातं. कर्ज मागणाऱ्याची पत पाहून बँका त्यानुसार कर्ज देत असतात. 

अशा वेळी पगार कमी असला म्हणून संकोच करण्याची गरज नाही. पात्रतेचे निकष पूर्ण करून आणि काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही कर्जासाठी सहज अर्ज करू शकता. त्यासाठी खालील गोष्टी ध्यानात ठेवणं गरजेचं आहे.

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याआधी या ५ गोष्टी करा!

 

कर्जाची रक्कम

कर्जाच्या हप्त्याचा बोजा येऊ नये म्हणून छोट्या रकमेच्या कर्जासाठी अर्ज करा. जेणेकरून तुमचं उत्पन्न कमी असलं तरी कमी रकमेच्या कर्जासाठी तुम्ही पात्र ठरू शकता. कर्जाचा कालावधी मोठा निवडल्यास तुमचा मासिक हप्ता कमी होऊन अधिक सुरळीतपणे कर्ज फेडू शकता.

सह-अर्जदार

कर्ज मंजुरीची शक्यता वाढविण्यासाठी जास्त उत्पन्न किंवा चांगले क्रेडिट स्कोअर असलेले गॅरंटर किंवा सह-अर्जदार जोडा.

हाय क्रेडिट स्कोअर

जर तुमचा क्रेडिट स्कोअर (७०० किंवा त्यापेक्षा जास्त) चांगला असेल तर कर्ज मंजुरीची शक्यता वाढते आणि व्याज दरातही सवलत मिळू शकते.  

तुमच्या कंपनीची प्रतिष्ठा

तुम्ही एखाद्या नामांकित कंपनीत काम करत असाल तर तुमचा पगार कमी असला तरी कर्ज मिळणं कठीण जात नाही. 

कर्ज-उत्पन्न गुणोत्तर

तुम्ही मागितलेल्या कर्जाची रक्कम कमी असल्यास तुमची पात्रता वाढते. त्यामुळं कर्ज-उत्पन्न गुणोत्तर ४० टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच जर तुमचा पगार १ लाख रुपये असेल तर तुमच्या कर्जाचा ईएमआय ४० हजार रुपयांपेक्षा कमी असावा.

हेही लक्षात ठेवा!

तुम्ही आर्थिक शिस्त राखता हे दिसावं म्हणून तुम्ही सातत्यानं बचत केली असली पाहिजे. तुम्ही छोट्या रकमेच्या कर्जासाठी अर्ज केला पाहिजे आणि त्यांची वेळेत परतफेड केली पाहिजे (यामुळं तुमच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होईल). तुमच्या आर्थिक स्थितीनुसार वेगवेगळ्या बँकांच्या अटी आणि शर्तींची तुलना करणं आवश्यक आहे.

Whats_app_banner