Yes Bank Share Price : येस बँकेचा शेअर सातत्यानं का वाढतोय, काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Yes Bank Share Price : येस बँकेचा शेअर सातत्यानं का वाढतोय, काय आहे कारण?

Yes Bank Share Price : येस बँकेचा शेअर सातत्यानं का वाढतोय, काय आहे कारण?

Jan 06, 2024 03:41 PM IST

Yes Bank Share Price : मागील चार वर्षांपासून अक्षरश: सरपटणारा येस बँकेचा शेअर आता उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे.

Yes Bank Share Price
Yes Bank Share Price

Yes Bank Share Price News : कर्ज घोटाळ्यामुळं आर्थिक गर्तेत गेलेल्या येस बँकेच्या शेअर्सनं पुन्हा उभारी घेतली असून या शेअरचा भाव सातत्यानं वाढत आहे. काल, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी ब्ँकेच्या शेअरनं ५ टक्क्यांची उसळी घेत ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. दिवसअखेर हा शेअर बीएसईवर ३.१० रुपयांवर बंद झाला. या शेअरमधील वाढीच्या कारणांची चर्चा आता सुरू झाली आहे.

मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात येस बँकेच्या शेअरची किंमत १४.१० रुपयांच्या पातळीवर होती. तेव्हापासून आतापर्यंत बँकेच्या शेअरच्या किमतीत ७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात या खासगी बँकेच्या शेअरच्या किंमतीत २२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या ६ महिन्यांपासून हा शेअर होल्ड करून बसलेल्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत ४० टक्के नफा कमावला आहे.

chemical stocks news : ईव्ही बॅटरीला वाढती मागणी; येत्या काळात मालमाल करू शकतात हे १० केमिकल स्टॉक

तिमाही निकालामुळं आशा वाढली!

चालू आठवड्याच्या सुरुवातीला येस बँकेनं तिसऱ्या तिमाहीतील व्यवसायाची माहिती शेअर केली होती. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कर्ज आणि अ‍ॅडव्हान्सची एकूण रक्कम २,१७,६६२ कोटी रुपये होती. तुलनात्मकदृष्ट्या बघता हा आकडा ११.९ टक्के अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा हा आकडा १,९४,५७३ कोटी रुपये होता. प्रत्येक तिमाहीगणिक कर्ज आणि अ‍ॅडव्हान्समध्ये ४.१ टक्के वाढ झाली आहे.

या तिमाहीत बँकेकडील ठेवींमध्ये १३.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण जमा भांडवल २,१४,८३१ कोटी रुपये होते. याशिवाय क्रेडिट टू डिपॉझिटचं प्रमाण ९० टक्क्यांवर आला आहे. वर्षभरापूर्वी हे प्रमाण ९१.१९ टक्के होतं.

Whats_app_banner