Yes Bank Share Price : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी स्थिर राहिले असले तरी काही शेअर्सनी गुंतवणूकदारांची नव्या वर्षाची सुरुवात दणदणीत केली. येस बँकेचा शेअरही यापैकीच आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात हा शेअर जवळपास ५ टक्के वाढीसह २२.४५ रुपयांवर बंद झाला.
येस बँकेचा शेअर आज सुरुवातीच्या सत्रात ७ टक्क्यांनी वाढून २३.०५ रुपयांवर पोहोचला होता. मागच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकाच्या किंचित खाली राहिला. बँकेकडं आलेली १५० कोटी रुपयांची आवक हे शेअर वाढण्याचं कारण मानलं जात आहे. एकाच ट्रस्टद्वारे सिक्युरिटी रिसीट पोर्टफोलिओमध्ये १५० कोटी रुपये आले आहेत, अशी माहिती येस बँकेनं ३१ डिसेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजला दिली आहे.
मागच्या एका महिन्यात येस बँकेच्या शेअरच्या किमती १४ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तर, गेल्या ६ महिन्यांपासून या खासगी बँकेचे शेअर्स होल्ड करून असलेल्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत ३७ टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. बीएसईवर या कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २३.०५ रुपये प्रति शेअर आहे आणि नीचांक प्रति शेअर १४.१० रुपये असा आहे.
येस बँकेनं २०१९ मध्ये शेवटचा लाभांश दिला होता. त्यावेळी एका शेअरवर २ रुपये देण्यात आले होते. सध्याच्या मूल्यांकनानुसार, कंपनीचं बाजार भांडवल ६५,११६.२० कोटी रुपये आहे.
(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या