Yes Bank Share : येस बँकेचा निव्वळ नफा तिपटीनं वाढला! निकाल जाहीर होताच शेअर उसळला!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Yes Bank Share : येस बँकेचा निव्वळ नफा तिपटीनं वाढला! निकाल जाहीर होताच शेअर उसळला!

Yes Bank Share : येस बँकेचा निव्वळ नफा तिपटीनं वाढला! निकाल जाहीर होताच शेअर उसळला!

Jan 27, 2025 12:18 PM IST

Yes Bank Share Price : खासगी क्षेत्रातील येस बँकेचे तिमाही निकाल जाहीर झाले असून बँकेचा निव्वळ नफा तिपटीनं वाढला आहे. त्याचं प्रतिबिंब शेअरच्या किंमतीत उमटलं आहे.

Yes Bank Share : येस बँकेचा निव्वळ नफा तिपटीनं वाढला! निकाल जाहीर होताच शेअर उसळला!
Yes Bank Share : येस बँकेचा निव्वळ नफा तिपटीनं वाढला! निकाल जाहीर होताच शेअर उसळला!

Share Market News : उद्योग जगतात तिमाही निकालांची मालिका सुरू असून येस बँकेनंही निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा जवळपास तिपटीनं वाढून ६१२ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. ताज्या निकालाचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले असून बँकेचा शेअर चांगलाच उसळला आहे.

आज सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअरची किंमत ३ टक्क्यांहून अधिक वाढली. सोमवारी बीएसईवर येस बँकेचा शेअर १८.६५ रुपयांवर उघडला. दिवसभरात कंपनीचा शेअर ३.३९ टक्क्यांनी वधारून १८.८७ रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत २५ टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

तिमाही निकालाचा तपशील

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून ९,३४१ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते ८,१७९ कोटी रुपये होतं, असं येस बँकेनं शनिवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. 

डिसेंबर तिमाहीत बँकेचं व्याज उत्पन्न वाढून ७,८२९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ६,९८४ कोटी रुपये होतं. खासगी क्षेत्रातील या बँकेचं निव्वळ व्याज उत्पन्न डिसेंबर तिमाहीत १० टक्क्यांनी वाढून २,२२४ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २,०१७ कोटी रुपये होतं.

एनपीए घटला!

बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन (निम) २.४ टक्क्यांवर स्थिर राहिलं आहे. डिसेंबर तिमाहीत ऑपरेटिंग नफा वाढून १०७९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ८६४ कोटी रुपये होता. मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीत डिसेंबर तिमाहीअखेर बँकेचं सकल अनुत्पादक मालमत्तेचं (एनपीए) प्रमाण सुधारून १.६ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

कशी आहे शेअरची वाटचाल?

येस बँकेच्या शेअरची मागील पाच वर्षांतील वाटचाल नकारात्मक राहिली आहे. गेल्या ५ वर्षांत बँकेच्या शेअरनं गुंतवणूकदारांचं जवळपास ५१ टक्क्यांचं नुकसान केलं आहे. मागच्या वर्षभरात शेअरनं २४ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागच्या सहा महिन्यातील परिस्थितीही तशीच आहे. 

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner