Yatra Online IPO : यात्रा कंपनीचा आयपीओ आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या इश्यूसाठी २० सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. या आयपीओंतर्गत कंपनीची ७७५ कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आहे. सध्या कंपनीची ६०२ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहेत. तर सध्याच्या स्थितीत प्रमोटर्स आणि शेअर होल्डर्स १.२१ कोटी रुपयांचे शेअर्स जारी करेल.
यात्रा कंपनी आँनलाईन ट्रॅव्हल अथवा पर्यटनाशी निगडित सेवा पुरवते. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरही पर्यटनाशी निगडित सेवा देते. कंपनी ग्राहकांना विविध प्रकारचे टूल्स आणि माहिती उपलब्ध करून देते. यामुळे ग्राहकांना रिसर्च करून, नियोजन करून टूरिस्ट डेस्टिनेशनची निवड करण्यास मदत मिळते.
तज्ज्ञांनी भारतातील वाढत्या पर्यटन क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन हा आयपीओ सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कंपनी भारतात टूरिझम क्षेत्रात एक मोठा हिस्सा काबीज करण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या वाढीचा फायदा आँनलाईन कंपन्यांनाही होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नफ्यातही सुधारणा होण्याची शक्यता आहे.
StoxBox ने या इश्यूला सबस्क्राईब रेटिंग्ज दिले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नफ्याच्या आकडे जाहीर केले होते. कंपनीच्या महसूलातही चांगली वाढ दिसत आहे. आनंद राठी यांनीही हा आयपीओ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.