Yash Highvoltage IPO : दोन दिवसांत ११ पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करण्याची आज शेवटची संधी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Yash Highvoltage IPO : दोन दिवसांत ११ पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करण्याची आज शेवटची संधी

Yash Highvoltage IPO : दोन दिवसांत ११ पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करण्याची आज शेवटची संधी

Dec 16, 2024 04:22 PM IST

Yash Highvoltage IPO : दोन दिवसांत ११ पट सबस्क्राइब झालेला यश हायव्होल्टेज लिमिटेडचा आयपीओ गुंतवणुकीसाठी आज बंद होत आहे. त्यामुळं आज शेवटची संधी आहे.

Yash Highvoltage IPO : दोन दिवसांत ११ पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करण्याची आज शेवटची संधी
Yash Highvoltage IPO : दोन दिवसांत ११ पट सबस्क्राइब झाला आयपीओ; अर्ज करण्याची आज शेवटची संधी

Yash Highvoltage IPO News : कॅलेंडर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. यश हायव्होल्टेज कंपनीचा आयपीओ त्यापैकीच एक आहे. दोन दिवसांत हा आयपीओ ११ पट सबस्क्राइब झाला असून यात गुंतवणूक करण्याची आज शेवटची संधी आहे.

यश हायव्होल्टेज कंपनीचा आयपीओ ११०.०१ कोटी रुपयांचा आहे. या माध्यमातून कंपनी ६४.०५ लाख शेअर्स विक्रीस काढणार आहे. तर, ११.३० लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जाणार आहेक. 

यश हायव्होल्टेज आयपीओ १२ डिसेंबर रोजी खुला झाला. आयपीओसाठी प्राइस बँड १३८ ते १४६ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं एकूण १००० शेअर्सचा लॉट केला आहे. त्यामुळं किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १ लाख ४६ हजार रुपयांसाठी अर्ज करता येणार आहे. 

ग्रे मार्केटमध्ये शेअरची स्थिती काय?

जीएमपी ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा आयपीओ आज १०० रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, १४ डिसेंबरपासून कंपनीच्या जीपीएममध्ये कोणताही बदल झालेला नाही. ग्रे मार्केटमध्ये आयपीओचा सर्वाधिक जीएमपी १३० रुपये आहे. 

अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले १३.३३ कोटी

कंपनीचा आयपीओ ११ डिसेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून ३१.३३ कोटी रुपये उभे केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांना देण्यात येणाऱ्या ५० टक्के समभागांचा लॉक-इन कालावधी केवळ ३० दिवसांचा आहे.

कोणी, किती केला सबस्क्राइब?

आयपीओला पहिल्या दोन दिवसांत ११ पटीहून अधिक सब्सक्रिप्शन मिळालं आहे. रिटेल कॅटेगरीमध्ये आयपीओ सर्वाधिक १८.१८ पट सब्सक्राइब झाला आहे. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत आयपीओ ९ पटीपेक्षा जास्त सब्सक्राइब करण्यात आला आहे. कंपनीची लिस्टिंग बीएसई एसएमईवर प्रस्तावित आहे. यश हाय व्होल्टेज लिमिटेड ही इलेक्ट्रिक क्षेत्राशी संबंधित कंपनी असून ट्रान्सफर बुशिंग करते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner