Dividend Stock : एका शेअरवर तब्बल ४०० रुपये लाभांश देतेय कंपनी, तुम्ही संधी साधली का?-yamuna syndicate ltd will gave 400 rupees dividend record date this week ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend Stock : एका शेअरवर तब्बल ४०० रुपये लाभांश देतेय कंपनी, तुम्ही संधी साधली का?

Dividend Stock : एका शेअरवर तब्बल ४०० रुपये लाभांश देतेय कंपनी, तुम्ही संधी साधली का?

Aug 23, 2024 11:52 AM IST

yamuna syndicate ltd dividend news : शेअर बाजारात आज यमुना सिंडिकेट लिमिटेडचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करतील. कंपनी प्रत्येक शेअरवर ४०० रुपये लाभांश देत आहे.

yamuna syndicate ltd : एका शेअरवर ४०० रुपये लाभांश देतेय कंपनी, आज शेवटची संधी
yamuna syndicate ltd : एका शेअरवर ४०० रुपये लाभांश देतेय कंपनी, आज शेवटची संधी

Dividend stock : लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. यमुना सिंडिकेट लिमिटेड या कंपनीनं एका शेअरमागे ४०० रुपये लाभांश जाहीर केला आहे.

यमुना सिंडिकेटचा डिविडंडसाठी आज, २३ ऑगस्ट २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. याचाच अर्थ हा शेअर आज बाजारात एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करणार आहे. ज्या गुंतवणूकदारांचं नाव गुरुवारी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये होतं, त्यांनाच या लाभांशाचा लाभ मिळणार आहे. लाभांशाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागलं होतं.

कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा लाभांश

यमुना सिंडिकेट लिमिटेडच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या शेअरवर एवढा मोठा लाभांश दिला जात आहे. याआधीही कंपनीनं गुंतवणूकदारांना भरघोस लाभांश दिला आहे. मात्र, यावेळचा लाभांश विक्रमी आहे. याआधी कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३२५ रुपये लाभांश दिला. २०२२ मध्ये कंपनीनं प्रत्येक शेअरवर २०० रुपयांचा लाभांश दिला होता. २०२१ मध्ये यमुना सिंडिकेट लिमिटेडनं एका शेअरवर ४० रुपयांचा लाभांश दिला होता.

शेअरची कामगिरी कशी आहे?

मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर गुरुवारी कंपनीचा शेअर ५६,१७५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गुरुवारी कंपनीच्या शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. गेल्या ३ महिन्यांत या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने हा शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत १०० टक्के नफा झाला आहे. गेल्या वर्षभरात शेअरच्या किंमतीत २२१ टक्क्यांनी वाढ झाली होती.

बीएसईमध्ये कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६६,९९९ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक १६,१०० रुपये आहे. कंपनीचं बाजार भांडवली मूल्य १७२६.६२ कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

विभाग