डिसेंबरमध्ये यामाहा धमाका करणार, २ स्पोर्ट्स बाईक बाजारात उतरवणार; इंजिन ते डिझाइनपर्यंत घ्या जाणून
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  डिसेंबरमध्ये यामाहा धमाका करणार, २ स्पोर्ट्स बाईक बाजारात उतरवणार; इंजिन ते डिझाइनपर्यंत घ्या जाणून

डिसेंबरमध्ये यामाहा धमाका करणार, २ स्पोर्ट्स बाईक बाजारात उतरवणार; इंजिन ते डिझाइनपर्यंत घ्या जाणून

Nov 20, 2023 06:22 PM IST

Yamaha Upcoming Bikes: या दोन्ही बाईकबाबत ग्राहकांना उत्सुकता लागली आहे.

Yamaha Bike
Yamaha Bike

Upcoming Bikes In 2023: यामाहा बाईकच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यामाहा पुढच्या महिन्यात त्यांच्या दोन स्पोर्ट्स बाईक यामाहा आर ३ आणि यामाहा एमटी ०३ लॉन्च करणार आहे. या दोन्ही बाईक १०० शहरांमध्ये निवडक ब्लू स्क्वेअर डीलरशिपद्वारे संपूर्ण देशभरात १५ डिसेंबरपासून विकल्या जाणार आहेत.

यामाहा आर ३ आणि मध्ये ३२१ सीसीचे लिक्विड कूल्ड पॅरलल ट्विन इंजिन देण्यात आले, जे ४२ बीपीएच पॉवर आणि २९.५ एनएम टॉर्क जनरेट करते. एमटी- ०३ मध्येही ३२१ सीसी इंजिन मिळत आहे. या बाईकची स्पर्धा बाजारात दाखल झालेल्या केटीएम ड्युक ३९० शी असेल. दुसरीकडे यामाहा आर ३ ची स्पर्धा केटीएम आरसी ३९० सोबत असेल. दोन्ही बाईक सीबीयू मार्गाने आयात केल्या जातील.

यामाहा आर ३ एक फुली-फेयर्ड बाइक आहे, ज्यात व्हायझेडएफ आर १५च्या वर स्थित असेल. यामाहाने या वर्षी एप्रिलमध्ये भारतात आपल्या मोठ्या बाइक्सच्या नवीन रेंजचे प्रदर्शन केले होते, ज्यात आर ३ आणि एमटी-०३ व्यतिरिक्त आर ७, आर १ एम, एमटी- ०७ आणि एमटी ०९ चा समावेश आहे.

यामाहा आर ३ ची किंमत कावासकी निंजा ४०० प्रमाणे असू शकते. या बाईकची एक्स शोरूम किंमत ३.५ लाखाजवळ असू शकते. ही बाईक केटीएमच्या तुलनेत अधिक महाग असू शकते. या बाईकमध्ये ग्राहकांना ट्विन सिलिंडरदेखील मिळू शकतो.

Whats_app_banner