गणेश चतुर्थीनिमित्त यामाहाची ग्राहकांना भेट! बाईक आणि स्कूटरवर मिळतायेत कॅशबॅकसह अनेक ऑफर्स-yamaha india offers discount on fz motorcycles and 125 cc fi hybrid scooter on ganesh chaturthi ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  गणेश चतुर्थीनिमित्त यामाहाची ग्राहकांना भेट! बाईक आणि स्कूटरवर मिळतायेत कॅशबॅकसह अनेक ऑफर्स

गणेश चतुर्थीनिमित्त यामाहाची ग्राहकांना भेट! बाईक आणि स्कूटरवर मिळतायेत कॅशबॅकसह अनेक ऑफर्स

Aug 31, 2024 05:29 PM IST

Yamaha FZ Motorcycles and Scooter Offers: गणेश चतुर्थीनिमित्त यामाहा कंपनीच्या बाईक आणि स्कूटरवर मोठी सवलत मिळत आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त यामाहाची ग्राहकांना भेट!
गणेश चतुर्थीनिमित्त यामाहाची ग्राहकांना भेट!

Yamaha India: येत्या ७ सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन होणर आहे. या खास सणानिमित्त जपानची दुचाकी निर्माता कंपनी यामाहाने भारतीय बाजारात सध्या असलेल्या बाईक आणि स्कूटरवर डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. यामाहा इंडियाने १५० सीसी एफझेड मॉडेल १२५ सीसी एफआय हायब्रिड स्‍कूटर्सवर ऑफर जारी केली. या सवलतींमध्ये कॅशबॅक, बाईक कर्जावरील कमी व्याज आणि कमी डाउन पेमेंट यासारख्या ऑफरचा समावेश आहे. ही ऑफर केवळ मर्यादीत काळासाठी उपलब्ध असेल.

एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ४.० डीएलएक्‍स, एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ४.०, एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ३.० आणि एफझेड एफआय या दुचाकीवर ३ हजारांची कॅशबॅक ऑफर मिळत आहे. ग्राहक ५ हजार ९९९ रुपये डाऊन-पेमेंट करून यापैकी कोणतीही बाईक घरी नेऊ शकतात.

एफझेड-एक्‍सवर ५ हजार रूपयांची कॅशबॅक आणि ५ हजार ९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंट ऑफर दिली जात आहे. फॅशिनो १२५ एफआय हायब्रिड/ रेझेडआर १२५ एफआय हायब्रिडवर २००० रूपयांची कॅशबॅक आणि २९९९ रूपयांचा लो-डाऊन पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे.

इतर कोणत्या बाईक ऑफर्समध्ये उपलब्ध

वायझेडएफ-आर३ (३२१ सीसी)

एमटी-०३ (३२१ सीसी)

वायझेडएफ-आर१५एम (१५५ सीसी)

वायझेडएफ-आर१५ व्‍ही४ (१५५ सीसी)

वायझेडएफ-आर१५एस व्‍ही३ (१५५ सीसी)

एमटी-१५ व्‍ही२ (१५५ सीसी)

एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ४.० (१४९ सीसी)

एफझेड-एस एफआय व्‍हर्जन ३.० (१४९ सीसी)

एफझेड एफआय (१४९ सीसी)

एफझेड-एक्‍स (१४९ सीसी)

 

'या' स्कूटर स्वस्तात खरेदी करण्याची संधी

ऐरॉक्‍स १५५ व्‍हर्जन एस (१५५ सीसी)

ऐरॉक्‍स १५५ (१५५ सीसी)

फॅशिनो एस १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी)

फॅशिनो १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी)

रेझेडआर १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी)

रेझेडआर स्ट्रीट रॅली १२५ एफआय हायब्रिड (१२५ सीसी).

 

लवकरच यामाहा एमटी- ०९ भारतात लॉन्च होण्याची शक्यता

यामाहा एमटी- ०९ भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. यामाहा एमटी- ०९ मध्ये अनेक बदलांसह बाजारामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. बाइकला आकर्षक लूक देण्यासाठी नवीन हेडलाइट आणि मोठी इंधन टाकी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या बाइकमध्ये एबीएस आणि तीन राइड मोडसह अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. यामाहा एमटी- ०९ मध्ये ८९० सीसी इनलाइन ट्रिपल सीपी३ इंजिन आहे, जे ११७ बीपीएच आणि ९३ एनएम टॉर्क जनरेट करते. यामाहा एमटी- ०९ अजून भारतात लॉन्च झालेली नाही. जर ही बाईक बाजारात एक्स- शोरूममध्ये किंमत सुमारे १३ लाख रुपये आहे.

विभाग