Share Market News : बिर्ला समूहाची कंपनी एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये गेल्या ५ वर्षांत ७४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे १ लाखांवरून ७५ लाख झाले आहेत. कंपनीच्या शेअरमधील ही तेजी आजही सुरूच असून आज हा शेअर ५.५६ टक्क्यांहून अधिक वाढून १२११.०५ रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या पाच वर्षांत एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये ७,४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स १६ रुपयांवरून १२०० रुपयांपर्यंत वधारले आहेत. एक्सप्रो इंडियाच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६७५.५५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८६७.१० रुपये आहे.
हा शेअर १४ फेब्रुवारी २०२० रोजी १६.६३ रुपयांवर व्यवहार करत होता, तो आज १२४८.८० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ७४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जर एखाद्या व्यक्तीनं १४ फेब्रुवारी २०२० रोजी एक्सप्रो इंडियाच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि गुंतवणूक रोखून ठेवली असती तर या शेअर्सची सध्याची किंमत ७५.०९ लाख रुपये झाली असती. कंपनीनं देऊ केलेल्या बोनस शेअर्सचा यात समावेश नाही, बोनस शेअर्समुळं झालेली मूल्यवाढ लक्षात घेतल्यास हा परतावा आणखी मोठा असू शकतो.
एक्सप्रो इंडिया या कंपनीनं आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीनं जुलै २०२२ मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअर दिले आहेत. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक २ शेअरमागे १ बोनस शेअर वितरित केला आहे. गेल्या चार वर्षांत एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये ३३६० टक्के वाढ झाली आहे. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी कंपनीचा शेअर ३५.९७ रुपयांवर होता, तो आज १२ फेब्रुवारी २०२५ रोजी १२४८.८० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांत एक्सप्रो इंडियाच्या शेअरमध्ये १२० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या