Redmi Smartphones: रेडमी कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन रेडमी नोट १३ आर प्रो बाजारात दाखल झाला आहे. हा फोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येतो. या फोनची खासियत म्हणजे यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, या फोनमध्ये फास्ट चार्जिंग आणि जबरदस्त डिस्प्ले देखील मिळत आहे. कंपनीने हा फोन तीन रंगात लॉन्च केला आहे. दरम्यान, रेडमी नोट १३ आर प्रो स्मार्टफोनमधील फीचर्स जाणून घेऊयात.
कंपनी या फोनमध्ये २४००x १०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६७ इंच फुल एचडी + पंच होल ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यायमध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये MediaTek Dimension ६०८० चिपसेट देत आहे.
फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात १०८ मेगापिक्सलच्या प्राथमिक कॅमेऱ्यासह २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये साइड फेसिंग फिंगरप्रिंट आहे. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरी देण्यात आली.
हा फोन एन्ड्राईड १३ वर आधारित MIUI १४ वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय ५, ब्लुटूथ ५.३ आहे. ३.५ एमएम हेडफोन जॅक, USB Type-C पोर्ट आणि GPS सारखे पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीने हा फोन नुकताच चीनमध्ये लॉन्च केला आहे. त्याची किंमत १ हजार ९९९ युआन (भारतीय चलनात २३ हजार ७०० रुपये) आहे. हा फोन भारतीय बाजारपेठेत पोको एक्स ६ निओ म्हणून प्रवेश करू शकतो, जो ६४ मेगापिक्सेल मुख्य कॅमेरासह येईल.