Redmi K80 Series Record Breaking Sale: टेक कंपनी रेडमीने नुकतेच आपल्या के सीरिज अंतर्गत दोन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले आहेत. रेडमी के८० आणि रेडमी के८० प्रो असे हे फोन आहेत. काल हे दोन्ही फोन चीनमध्ये पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. हा सेल लाईव्ह होताच फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. रेडमी के ८० सीरिजचे हे फोन एका दिवसात ६ लाखांहून अधिक लोकांनी खरेदी केला.
दोन्ही फोन ५ व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. रेडमी के८० च्या बेस १२ जीबी + २५६ जीबी व्हेरियंटची किंमत २४९९ युआन (अंदाजे २९,१७० रुपये) आहे. रेडमी के८० प्रोच्या १२ जीबी + २५६ जीबी व्हर्जनची किंमत ३६९९ युआन (सुमारे ४३,१८० रुपये) आहे. हे दोन्ही फोन स्नो रॉक व्हाईट, माउंटेन ग्रीन आणि मिस्ट्री नाईट ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
या फोनमध्ये ६.६७ इंचाचा २के रिझोल्यूशन आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 4 एनएम चिपसेट देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा ओआयएस+ ईआयएस प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. फ्रंटमध्ये २० मेगापिक्सलचा ओमनीव्हिजन सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या रेडमी फोनमध्ये ६५५० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
प्रो व्हेरियंट स्नॅपड्रॅगन ८ एलिट ३ एनएम चिपसेटसह येतो. यात ६००० एमएएच ची बॅटरी आहे जी १२० वॅट वायर्ड आणि ५० वॉट वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बेस आणि प्रो व्हेरियंटचा कॅमेरा एकच आहे, बस प्रोमध्ये ३२ एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे, जो बेसमध्ये ८ एमपी आहे.