Xiaomi Redmi Note 14 Series Price and Features: शाओमीचा सब-ब्रँड रेडमी या महिन्यात चीनमध्ये रेडमी नोट १४ सीरिज लॉन्च करणार आहे. या सीरिजअंतर्गत रेडमी नोट १४ 5G, रेडमी नोट १४ प्रो 5G आणि रेडमी नोट १४ प्रो प्लस 5G लॉन्च केले जाऊ शकतात. रेडमी नोट १४ सीरिज जानेवारी २०२५ मध्ये भारतात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका वेबसाइटने रेडमी १४ सीरिजच्या फोनची संभाव्य किंमत आणि फीचर्सची माहिती देण्यात आली आहे.
गिझमोचायनानुसार, रेडमी नोट १४ मध्ये १.५ के एमोलेड १२० हर्ट्झ स्क्रीन असू शकते. परफॉर्मन्ससाठी यात ६ एनएम मीडियाटेक डायमेंसिटी ६१०० प्रोसेसर असू शकतो. यात मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी लेन्स असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत २० हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
या फोनमध्ये स्क्विकल कॅमेरा मॉड्यूल असू शकतो. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर स्मार्टफोनमध्ये १.५ के एमोलेड स्क्रीन मिळू शकते. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ एस जेन ३ प्रोसेसर मिळू शकतो. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, अल्ट्रावाइड लेन्स आणि टेलिफोटो लेन्स असल्याची चर्चा आहे. हा फोन ९० वॉट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. भारतात स्मार्टफोनची किंमत २७ हजार ते २८ हजारांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
हा फोन या सीरिजमधील सर्वात महागडा फोन असेल, रेडमी नोट १४ प्रो प्लसमध्ये १.५ के कर्व्ड एमोलेड स्क्रीन असू शकते. डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, हे नोट १४ प्रो सारखे असू शकते. परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोनला ४ एनएम डायमेंशन ७३५० चिपसेट मिळू शकतो. रिपोर्टनुसार, नोट १३ प्रो प्लसच्या २०० एमपीच्या तुलनेत हँडसेटला ५० एमपी प्रायमरी लेन्स मिळू शकते. भारतात स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ३३०००-३४००० रुपये असण्याची शक्यता आहे.
रेडमी नोट १४ सीरिज अँड्रॉइड १४ वर आधारित शाओमी हायपरओएसवर चालेल. या अहवालातील सर्व माहिती लीक आणि अंदाजांवर आधारित आहे. रेडमी नोट १४ मधील फीचर्स आणि किंमतीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.